माढा तालुक्यातील रांजणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचा प्रचाराचा शुभारंभ

सभेला तुफान गर्दी
माढा प्रतिनिधी - माढा तालुक्यातील रांजणी (दे) येथे राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार सभेचा शुभारंभ नारळ फोडून करण्यात आला. या प्रसंगी माढा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व संभाव्य उमेदवार मोठ्या उत्साहात उपस्थित होते. या प्रचार शुभारंभ कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील, शिवसेनेचे माढा लोकसभा संपर्क प्रमुख व ज्येष्ठ नेते संजय कोकाटे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या एकत्रित उपस्थितीतून आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची ताकद, एकजूट आणि जनतेचा विश्वास स्पष्टपणे दिसून आला. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आणि विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जाणार असून, जनतेचा विश्वास निश्चितच विजयात रूपांतरित होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form