पंढरपूर प्रतिनिधी -- भारताच्या गौरवशाली संविधानाची अंमलबजावणी ज्या दिवशी
झाली,त्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पंढरपूर शहर पोलीस स्टेशन
येथे अत्यंत उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात झेंडावंदन कार्यक्रम संपन्न झाला.या
प्रसंगी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत संविधानिक मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त करण्यात
आली.याप्रसंगी स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना,
महाराष्ट्र राज्य (भारत) यांचे पंढरपूर शहर व तालुका स्तरावरील पदाधिकारी व सदस्य
मोठ्या संख्येने उपस्थित होते. या झेंडावंदन कार्यक्रमावेळी सर्व उपस्थितांनी
राष्ट्रगीताच्या तालावर अभिमानाने उभे राहत देशप्रेम,कर्तव्यनिष्ठा व सामाजिक
जबाबदारीची भावना अधोरेखित केली.कार्यक्रमा दरम्यान पोलीस प्रशासन व सामाजिक
संघटनांमधील समन्वय,शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठीचे योगदान तसेच नागरिकांमध्ये
कायदेविषयक जागृती निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. स्वराज्य पोलीस
मित्र पत्रकार आणि माहिती अधिकार संघटना या माध्यमातून समाजहितासाठी चालविल्या
जाणाऱ्या उपक्रमांचेही कौतुक करण्यात आले.प्रजासत्ताक दिनाचा हा सोहळा केवळ औपचारिक
कार्यक्रम न राहता, संविधान, लोकशाही आणि राष्ट्रीय एकतेप्रती असलेली बांधिलकी अधिक
दृढ करणारा ठरला. शेवटी “जय हिंद”च्या घोषणांनी परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून
गेला. सदर कार्यक्रमासाठी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री कैलास कारंडे
पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री उमेश ढोबळे पश्चिम महाराष्ट्र संघटक श्री विजय
वाघमारे पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रविण सुरवसे सोलापूर जिल्हा संघटक ज्योतीताई शेटे
पंढरपूर तालुका उपाध्यक्ष नागेश राहीरकर पंढरपूर महिला तालुका उपाध्यक्ष सुवर्णा
कुरनावळ पंढरपूर तालुका प्रवक्ता संतोष चव्हाण सहसचिव लक्ष्मण अभंगराव प्रभारी
गंगाधर स्वामी पंढरपूर शहर संपर्कप्रमुख दत्तात्रय कमले सदर पदाधिकारी उपस्थित
होते.

