अक्कलकोट प्रतिनिधी दि. 3
स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी अक्कलकोटचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत रामचंद्र वेदपाठक यांची निवड करण्यात आली त्याच बरोबर सोलापूर जिल्हा प्रभारी म्हणून इफ्तेकार कामतीकर तसेच सोलापूर शहराध्यक्ष पदी विनोद भोसले यांची निवड करण्यात आली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे व संस्थापक महासचिव कमलेश शेवाळे (देवा सर )यांनी स्वराज्य चौथ्या वर्धापन दिवशी ठाणे येथील कार्यक्रमात केली आहे, या निवडचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.
स्वराज्य चे चतुर्थ वर्धापन दिन ठाणे रेल्वे स्टेशन च्या बाजूला असलेल्या रेल्वे सभागृहात मोठया थाटात पार पडला. या वेळी अक्कलकोट तालुक्यात स्वराज्य माध्यमातून सामाजिक क्षेत्रात सर्वोत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल चंद्रकांत वेदपाठक यांच्या सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आला, स्वराज्य च्या जिल्हाध्यक्ष पदी निवडीचे पत्र देऊन बढती देण्यात आल्याने सर्वत्र वेदपाठक यांचे अभिनंदन होत आहे.
या प्रसंगी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा सौ. धनश्रीताई उत्पात, विश्वस्त सौ. संगीता बोराडे, सौ सविता तावरे उमेश काशीकर, प्रशांतजी निकम संचालक सुरेखा कोकरे, रविंद्रजी करंगुटकर, विशाल बोराडे, संदिप जाधव वैशालीताई कांबळे स्वराज्य चे सोलापूर शहर अध्यक्ष विनोद भोसले, जिल्हा प्रभारी इफ्तेकार कामतीकर, माजी समन्वयक सुनील पंडित, ( लाला ) इम्तियाज बागवान, सुनील बेंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा अध्यक्ष पदी चंद्रकांत वेदपाठक यांच्या निवडचे अक्कलकोत स्वराज्य चे गुरुनाथ पोतदार, दिपक पोतदार, श्रीमती मीराबाई बुद्रुक, पंकज कोरेकर , काशिनाथ पोतदार सौ. वर्षाताई चव्हाण, गौरीशंकर चनशेट्टी, दयानंद बिडवे, बलभीम पवार, शिवलिंगप्पा संगापुरे, अप्पासाहेब धुमाळ आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Tags
सामाजिक वार्ता