नांदेड जिल्हा प्रतिनिधी --
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी सं.नांदेड महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष हभप राम महाराज पांगरेकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर गेल्या सात वर्षापासून विविध सामाजिक, धार्मिक कार्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये नेहमी अग्रेसर आहे. संस्थेच्या माध्यमातून गेली सात वर्षापुर्वी फक्त ४२ साधकापासुन आजपर्यंत ९५४५ साधकांना मोफत व घरपोच ग्रंथराज ज्ञानेश्वरी भेट देऊन पारायण करण्यास बसवले आहे. याचप्रमाणे प्रत्येक साधकांनी एक झाड लावावे ही प्रतिज्ञा साधकांनी पूर्ण केली आहे.
तसेच रक्तदान शिबिराच्या माध्यमातून संस्थेने सामाजिक कार्यास हातभार लावला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यातील व राज्यभरातील गोरगरीब वारकऱ्यांच्या सोयीसाठी सर्वांच्या योगदानातून व सहकार्यातून पंढरपूर येथे धर्मशाळा उभारण्यासाठी एका वर्षाच्या आत पंढरपूर महानगरपालिकेमध्ये संस्थेच्या नावे जागा घेण्यात आली आहे. त्या जागेवर धर्मशाळेचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. त्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा दि:०९ जून सोमवार रोजी सकाळी ११:०० वा. गुरुवर्य प्रयागगिरीजी महाराज, ब्रह्मानंद सरस्वतीजी महाराज, सद्गुरू नराशाम महाराज, गजेंद्र चैतन्यजी महाराज, मधुसूदन महाराज व अनेक साधुसंतांच्या हस्ते संपन्न होणार आहे..
या भूमिपूजन सोहळ्यासाठी संस्थेचे सर्व मार्गदर्शक रावसाहेब पा, दत्तराम पा.रामजी पा, व्यंकटराव पा. कपाटे, व्यंकटराव पा.ढगे, रामराव महाराज माने, दत्तराम गोरठेकर, शिवाजी पांगरेकर, बालाजी जाधव, गंगाधर पा.भरकडे ,केशव पा. कौशल्ये, गणेश पा.पवार व सर्व मार्गदर्शक आणि सल्लागार. महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अनिताताई पतंगे, जिल्हा सचिव कालिंदीताई पंढरपूरकर, उपाध्यक्षा कान्होपात्राताई कुंडलवाडीकर, महिला सदस्य कुसुमताई शिंदे,नंदाताई गाढे, जयश्रीताई जाधव व सर्व महिला आघाडी, प्रसिध्दी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल, मल्टिमीडियाचे , पत्रकार याचप्रमाणे राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हभप राम महाराज पांगरेकर, संस्थापक सचिव हभप व्यंकट महाराज जाधव माळकौठेकर, कोषाध्यक्ष शिवाजी मदमवाड ,सहसचिव प्रभाकर महाराज पुय्यड, संस्थापक सदस्य गुलाब पा.उबाळे, हरिनाम पा.कदम, त्रिमुख पा. एडके, श्री बंडू पा.कदम, प्रवीण रौतुलवाड, भगवान पा.रहाटीकर, सर्व तालुका अध्यक्ष विश्वनाथ बंडे,नागोराव मेंढेवाड,प्रभाकर पा.पवळे, बालाजी पा.शिंदे, सोपान पा.गिरे,मुंजाजी पा.धुमाळ,मधुसूदन पा.कदम,विठ्ठल पा. धारजणे, मारोती पा.वडजे,राजेश्वर पा.गागलेगावकर,मदन घुगे,विवेकानंद पा.कसरे,कृष्णाजी पा.भरकडे,शंकर देवकत्ते,माधवराव बोईनवाड,बालाजी पांढरे परिश्रम घेत आहेत.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रसिद्धीप्रमुख चंपतराव पा. डाकोरे, प्रसिध्दी कोषाध्यक्ष रामभाऊ चन्नावार,अशोक वाघमारे,तथा संपूर्ण मल्टीमीडिया टीमच्या वतीने करण्यात येत आहे.
Tags
सामाजिक वार्ता