सातारा प्रतिनिधी-
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळे गावचे सुपुत्र स्वप्निल वागडोळे एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने यांची महसूल सहाय्यक अधिकारीपदी निवड झाली आहे.
स्वप्निल वागडोळे यांचे आई घरकाम करत तर वडील पेट्रोल पंपावर नोकरीस होते एक वर्षापूर्वी त्याचे निधन झाले.यानंतर स्वप्निल यांनी एका खासगी कंपनीत नोकरी करत पुढील शिक्षण पूर्ण केले व आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.स्वप्निल यांचे शिक्षण-दहावीपर्यंत छत्रपती विद्या मंदिर तारळे व बीकॉम आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नागठाणे येथे झाले.एमपीएसीसीअभ्यास करताना त्यांना अमित सर व समाधान सर यांचे मोलाचे मार्गदर्शन झाले व फिनिक्स अभ्यासिका तारळे इथे एमपीएससी अभ्यास केला.
आपल्या मुलाला उत्तम शिक्षण दिले पाहिजे या जिद्दीने त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्याची ध्येय उराशी बाळगले व त्यांनी स्वप्निल यास त्यांनी उच्च शिक्षण दिले स्वप्निल यांनी आईवडीलांची साथ देत त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत आपण उच्च शिक्षित व्हायचं ही खुणगाट मनात बांधली. एमपीएससी परीक्षेचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी त्यांनी अभ्यासाचा अहोरात्र सराव करून अखेर स्वप्निल वागडोळे 2023 च्या एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाला असून त्याची महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे. शिक्षक , मित्र परिवार यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभले आहे स्वप्निल वागडोळे यांची महसूल सहाय्यक पदी निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Tags
शैक्षणिक वार्ता