वाढदिवस विशेष --
मनाने स्वच्छ, प्रामाणिक, आपण समाजाचं देणं लागतो ही एक सामाजिक बांधिलकी ठेऊन आपल्या हातून जेवढी समाज सेवा होईल तेवढे करण्यासाठी नेहमी धडपड करणारे सोनार समाज संस्टन, सोलापूर जिल्हा, सोलापूर चे अग्रणी प्रवर्तक आदरणीय श्रीं संतोषशेठ कळमणकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने......
श्री संतोषशेठ कळमणकर यांची अतूट सामाजिक बांधिलकी हा त्यांच्या कार्याचा आधारस्तंभ आहे. त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील भरीव कार्य विविध संस्था, संघटना मधील त्यांचे नेतृत्व, समाजाच्या विकासासाठी असलेला व्यापक दृष्टिकोन प्रतिबिंबित करते. अध्यक्ष, संचालक, प्रवर्तक, सल्लागार या नात्याने त्यांची भूमिका समाजाच्या कल्याणासाठी सकारात्मक प्रभाव निर्माण करण्याची त्यांची वचन बद्धता
अधोरेखित करते. सोबत एक दूरदर्शी नेता म्हणून सामाजिक बदलाची प्रेरणा त्यांनी आपल्या निस्वार्थी सेवेतून समाजाला देतात. श्री संतोषशेठ कळमणकर यांचे सर्वांगीण विकासासाठी महत्व पूर्ण असे सामाजिक कार्यात त्यांचे मोलाचे योगदान दिले आहे, देत आहेत. अशी ही त्यांची दूरदृष्टी प्रतिमा वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा साक्षीदार पूर्ण सोलापूर जिल्हा असून, त्यांची ख्याती आहे. असे नांव लौकिक करणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री संतोषशेठ कळमणकर होय. वेगवेगळ्या संधीचा सदुपयोग कसा करून घ्यायचा हे अशा सुज्ञ व्यक्तीकडून शिकायला मिळालं तर त्याचे आश्चर्य वाटायला नको. कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या पाठीशी एक स्त्री असे म्हणतात ते खरेच आहे. त्यांच्या पाठीशी नेहमी त्यांच्या पत्नी सौं. संध्याताई खंबीरपणे उभे राहिलेले पाहिले आहे.त्यांनी सर्व मुलांचे शिक्षण व इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळल्या त्यामुळेच चांगले सामाजिक कार्य करू शकलो, त्यामुळेच यश मिळाले अशी श्री संतोषशेठ यांची भावना आहे. आयुष्यात बोटावर मोजण्या सारख्या अशा फार कमी व्यक्ती असतात कीं, ज्या स्वतःला समाजासाठी वाहून घेणारे असतात. त्यांच्या उत्स्फूर्त दायक कामाने आणि ज्ञानाच्या आवाक्याने सारे अवाक होतात. एखाद्या कामाबद्दल ची त्यांची जिद्द, चिकाटी, आत्मीयता आणि आत्मविश्वासाने कसे पूर्ण करावे हे त्यांच्या कडून शिकायला मिळते. त्यांची ओघवती भाषा आणि स्मित हास्य खूप मधुर आहे. आजच्या घडीला सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करण्याचे काम निष्ठेने व शांतपणे ते करत राहतात. कुटुंबाप्रति, मित्र परिवाराप्रति, प्रिय जन, नातेवाईकांप्रति, सदैव आपुलकीने व प्रेमाने राहिले आहेत. प्रत्येक काम खंडित न होता सातत्यपूर्ण कसे राहील याकडे लक्षित राहतात. अशी निष्ठावान आणि कार्यावर प्रेम असणारी माणसं आज आभावानेच आढळतात. निगर्वी आणि कुठलाही राजकीय पक्षाचा गंध लागलेला त्यांना दिसत नाही. ते स्थितप्रज्ञ्, धीरगंभीर, हे गुण त्यांच्यात वडिलांकडून वारसा हक्काने आले आहेत. त्यांच्या प्रयत्नपूर्वक कार्याला नेहमी यशाची झळाळी येते.
आदर्श जीवन जगनरेन, ध्येयनिष्ठ जपणारे, सर्वांप्रति प्रेम, आपुलन, आदरभाव बाळगणारे व वेळ प्रसंगी मदतीचा हात पुढे करणारे श्री संतोषशेठ कळमणकर एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. याच बरोबर एक चांगला पिता, पती, मित्र आणि सहकारी आहेत.कामाबद्दल कुठल्याही अन्य विचार सरणीच्या परस्पर संबंध व संघर्ष कधीच आपल्या चेहऱ्यावर येऊ दिला नाही. सर्वाना सांभाळणे, सांभाळून घेणे हे माझे काम आहे असेच सदैव म्हणताना ते दिसतात.श्री संतोषशेठ कळमणकर यांनी पंढरपूर च्या नरहरी मंदिराला, मैंदर्गी च्या मोनेश्वर, विरभद्र, आणि कालिका देवी मंदिराला, शेळगी च्या विठ्ठल रखुमाई व सोलापूरच्या श्री कालिका देवी मंदिराला उदार हस्ते देणाग्या दिल्या आहेत.तसेच अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील एका हायस्कुल च्या कार्यकारी मंडळाच्या विनंतीनुसार शाळेच्या प्रांगणात तीनसे फूट खोल एक बोअर विहीर घेऊन त्यावर मोटार बसवून कायम स्वरूपी विध्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली.त्यांच्या सामाजिक लक्षवेधी आणि उल्लेखनीय कार्याची नोंद घेऊन विविध सामाजिक संस्थानी, कोविड योद्धा, समाज भूषण, समाज गौरव, समाज रत्न, विश्वकर्मा समाज भूषण, उद्योग रत्न आदि विविध पुरस्काराने गौरऊन सन्मानीत केले आहेत. अशा या चतुरस्त्र अर्थात चतुर, चाणाक्ष, चोहीकडे लक्ष, नजर ठेवणारा, तरबेज, निष्णात, पारंगत, सदैव जगारुकन, सारखा सतर्क राहणाऱ्या हुशार व्यक्तिमत्वाबद्दल लिहिताना शब्द अपुरे पडतील. श्री संतोषशेठ कळमणकर शतायुषी व्हावेत, त्यांना उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य लाभावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो व जन्मदिनाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो.
*वसंत पोतदार सोलापूर*
9423065915
Tags
सामाजिक वार्ता