*एक समर्पित सेवाभावी व्यक्तिमत्व* *सिस्टर सौं. सुनंदा सोनार, सोलापूर*

परिचारक दिन विशेष...
आज 12 मे जागतिक परिचारिका दिवसाच्या निमित्ताने.परिचारिकेच्या योगदानाचे स्मरण आणि आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी  12 मे जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात येतो. परिचारिकेच्या योगदानाबद्दल व त्यांच्या धैर्याबद्दल त्यांच्या कार्याचा आदर करण्याचा हा दिवस.
कांहीही आपले ऋणानुबंध नसताना अगदी आपुलकीने मनोभावे विचारपूस करीत रुग्ण सेवा देत आयुष्य व्यथित करीत सोलापूर च्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय मध्ये सेवा बजावत असलेले ,  सोनार समाजाप्रती आपले योगदान देणाऱ्या परिचारिका सौ सुनंदा गजाननराव सोनार यांना आजच्या परिचारिका दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. सौं. सुनंदा गजाननराव सोनार यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर आरोग्य क्षेत्रात स्वतःला झोकून दिले. त्यांच्या कार्याचा आलेख केवळ आरोग्य क्षेत्रापुरता मर्यादित न राहता समाज सेवेत ही उंचावत आहे.त्यांना बोलते केल्यावर त्या सांगू लागल्या.
नमस्कार, मी सौं. सुनंदा गजाननराव सोनार. मी सध्या वॉर्ड इन्चार्ज म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे सेवा करते मी सन 1997 पासून सेवेत असून परिचारिका म्हणून सेवेत प्रारंभ केले. माझी स्टाफ ड्युटी तीन शिफ्ट मध्ये असते. माझे पती श्री गजाननराव भीमराव सोनार हे एका औषध कंपनी त  रिजनल सेल्स मॅनेजर म्हणून 30 वर्षें सेवा करून निवृत्त झाले आहेत. मला दोन मुले असून दोघेही कॉम्पुटर इंजिनियर आहेत. मोठा मुलगा विवाहित असून पुणे येथे जॉब करतो. त्याला एक मुलगी असून त्याची पत्नी म्हणजे माझी मोठी सून सौं. प्रतीक्षा ही जॉब करते. लहान मुलगा मुबंई येथे जॉब करतो, तो अविवाहित आहे. पुणे येथे बदलून येण्यासाठी त्याचे प्रयत्न चालू आहेत. कोरोना काळात माझी ड्युटी कोरोना वॉर्डातच होती. त्या काळात रुग्णांच्या सेवेसाठी माझ्या कुटुंबाला दुर्लक्षित करून सेवा दिली. रुग्णांच्या सेवेत खूप मोठे समाधान आहे. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा समजून मी काम करते. सर्वांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून मी कर्तव्य भावनेने हे काम मी करीत आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाताना त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हेच माझ्या सेवेचे फळ आहे. त्यात मला परिचारिका असल्याचा अभिमान आणि आनंद आहे. रुग्णालयात येणारे रुग्ण मला परिचारिका, नर्स, सिस्टर अशा वेगवेगळ्या नावानी हाका मारतात. आणि त्या खूप विस्वासाने त्यांना होणारे त्रास मला सांगतात. परंतु परिचारिकेचे आयुष्य हे वरून वाटते तितके सहज आणि सोपे नाही. एखाद्या गंभीर आजाराने घाबरलेल्या स्थितीत रुग्ण रुग्णालयात दाखल होतो. तेंव्हा डॉक्टर येण्याच्या अगोदर त्या रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना सामोरे जाऊन त्यांना धीर देण्याचे काम एक नर्स म्हणून मला करावे लागते. रुग्णाचे ऑपरेशन झाले असेल किंवा एखाद्या आजारामुळे रुग्णालयात ऍडमिट करून ठेवावे लागले असल्यास त्या रुग्णास वेळोवेळी औषधं, गोळया देणे, त्याचे जेवण खाण बघणे, त्यासोबतच गरज पडल्यास इंजेकशन देणे, सलाईन चढविणे आदि कामे एक परिचारिका म्हणून खूप जबाबदारीने करावी लागतात.मी एक नर्स म्हणून माझे काम निष्ठेने व खूप चोख पणे करण्याचा मी प्रयत्न करते. परंतु कांही वेळा असे प्रसंग येतात जेव्हा माझ्या अनुभवाचा कस लागतो. नर्स असूनही  कित्येक वेळा मी हळवी होते. वयस्कर आजी, आजोबा रुग्णालयात ऍडमिट होतात तेंव्हा त्यांना होणारा त्रास, वेदना मला पाहून खूप वाईट वाटते. तथापी एक नर्स म्हणून मी माझे कर्तव्य लक्षात ठेऊन आणि त्याचे मनोबल, मनोधैर्य खचू न देता, धासळू न देता मी संपूर्ण मनापासून त्याची सेवा शुश्रुषा करून, त्याची तब्येत व्यवस्थित करून त्याच्या घरी सुखरूप  जाई पर्यंत त्याच्याकडे लक्ष देते. रुग्ण बरे होऊन घरी जातात तेंव्हा मला पुन्हा पुन्हा अनेक आशीर्वाद आणि डॉक्टरांना धन्यवाद देऊन जातात. हे सर्व बघून माझे मन खूप खूप भरून येते. नर्स च्या या कामामुळे माझे कित्येक वेळा माझ्या कुटुंबाकडे दुर्लक्ष झालेले आहे. परंतू माझ्या कुटुंबातील माझी दोन्ही मुले, पती श्री. गजाननराव खूप समजूतदार असल्यामुळे ते सर्वजण नेहमी मला माझ्या कामामध्ये प्रोत्साहन देऊन भक्कम पाठिंबाच देतात. आता पर्यंत मी माझे काम पूर्ण जबाबदारीने, निष्ठेने, प्रामाणिकपणे करीत आलेली आहे. आणि यापुढेही निःश्वार्थ पणे करीत राहीन. माझी सेवा अजून दोन वर्षें शिल्लक राहिली आहे. आज मी समाजाकडून एवढीच अपेक्षा करते कीं, आरोग्य क्षेत्रातील लोकांचा, कर्मचाऱ्यांचा नेहमी आदर करा कारण आपले आणि आपल्या जवळील लोकांचे रक्षण करण्यासाठी डॉक्टर व माझ्यासारख्या अनेक नर्सेस प्रयत्नशील असतात.
नर्स असा शब्द उच्चारल्या बरोबर रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या, रुग्णतील कुटुंबातीलच एक सदस्य बनून आरोग्याची काळजी घेणाऱ्या आपल्या सौं. सुनंदा सोनार सिस्टर च  आपल्यासमोर उभ्या राहतात. कोरोना काळात त्या स्वतःच्या कुटुंबाला दुर्लक्षित करून त्यांनी रुग्ण सेवा दिली आहे. त्यामुळे त्यांची मानवतेची सेवा नेहमीच आदरास पात्र ठरली आहे. त्यांच्या लक्षवेधी आणि उल्लेखनिय सेवेची नोंद घेऊन सोनार समाज संस्था सोलापूर जिल्हा, सोलापूर यांनी त्यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानीत केले आहे. याशिवाय त्यांना  समाज गौरव, तेजस्विनी नारी शक्ती, आदर्श माता आदि पुरस्काराने गौरव करून सन्मानीत केलेले आहे. आज 12 मे परिचारिका दिवस ! त्यांची केलेली सेवा व त्यांनी करत असलेल्या मानवतेच्या सेवेचा गौरव करण्याचा आजचा दिवस आहे. म्हणून कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्य ठरते. परंतू त्यांनी करत असलेल्या निःश्वार्थ कार्याबद्दल आमच्यात असलेली कृतज्ञता शब्दात व्यक्त करता येत नाही. आपण देव नसला तरी देवदूत तरी नक्कीच आहात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !  परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून येथेच थांबतो. दुःखात सांत्वन आणि संकटात आधार देणाऱ्या, प्रेमाने आणि धैर्याने कर्तव्य पार पडणाऱ्या आणि आरोग्य सेवेचा कणा असलेल्या सिस्टर सौं. सुनंदा गजाननराव सोनार यांचा संपर्क क्रमांक 99211 69881 असा आहे.
*वसंत पोतदार सोलापूर* 
94230 65915.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form