अक्कलकोट येथे 18में रोजी 111 सुवर्णरत्नांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन


अक्कलकोट दि. 11  
अक्कलकोट येथे  18 मे रोजी आयोजित 111 सुवर्णरत्नांचा सन्मान सोहळा व पुरस्कार प्रदान सोहळा शिवसेना अक्कलकोट, सोनार हक्क परिषद जिल्हा सोलापूर व स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना तालुका अक्कलकोट यांच्या संयुक्त विध्यमाने आयोजित,  या कार्यक्रमाचे नियोजन बद्दलही माहिती कार्यक्रमाचे आयोजक व संयोजक  चंद्रकांत दादा वेदपाठक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
  

सदर कार्यक्रमाचे आयोजन सर्जेराव जाधव सभागृह, अक्कलकोट येथे रविवारी दिनांक 18में रोजी असलेल्याचे व सन्मान सोहळ्याकरिता प्रमुख पाहुण्यांची नावे, कार्यक्रमांची रुपरेषा, कोणत्या जिल्ह्यातील किती पुरस्कार प्राप्त मान्यवर येणार, याची संपूर्ण माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेत सोलापूर शहरातील सर्व वृतपत्राचे प्रतिनिधी व सोशल मिडीयचे प्रतिनिधी सह अक्कलकोट शिवसेनेचे विधानसभेचे संघटक प्रा. सूर्यकांत कडबगांवकर, सोनार हक्क परिषदेचे जिल्हा समन्वयक सुनील पंडित, सोलापूर वधुवर सुचक मंडळाचे  संतोष दीक्षित भंडारकवठेकर, अक्कलकोट संत शिरोमणी नरहरी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक पोतदार व  चंद्रकांत दादा वेदपाठक सामाजिक मित्र मंडळाचे अध्यक्ष कल्लप्पा खेडगी सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form