स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना पंढरपूर शहर व तालुका यांच्यावतीने एक मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने उत्कृष्ट सेवा कार्य पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न ....

 
पंढरपूर प्रतिनिधी--                   
 स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना पंढरपूर शहर व तालुका यांच्यावतीने एक मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने उत्कृष्ट सेवा कार्य पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न                         
            स्वराज्य पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  दीपक कांबळे साहेब व संस्थेचे मुख्य महासचिव  कमलेश शेवाळे  यांच्या मार्गदर्शनातून पंढरपूर शहर व तालुका यांच्यावतीने आज पंढरपूर मध्ये उत्कृष्ट पोलीस कर्मचाऱ्यांचा त्यांच्या आजवर पोलीस खात्यात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पंढरपुरातील रसिकराज दालनामध्ये *उत्कृष्ट सेवा कार्य* हा पुरस्कार पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रमुख  विश्वजीत घोडके यांच्या हस्ते मान्यवरांना मानचिन्ह ,शाल ,गुच्छ व एक पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.                 
            सदर कार्यक्रमासाठी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष व विश्वस्त सौ धनश्रीताई उत्पात व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष  रामभाऊ बडवे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष  कैलास कारंडे हे उपस्थित होते.    
              सदरचा पुरस्कार हा पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे मा. मुजावर साहेब व मा. सुनीता जाधव पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे मा. विजयकुमार आवटे व मा. प्रियंका ननवरे तसेच पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे मा.अजित मिसाळ व मा. मोनिका वाघे यांना देण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे पंढरपूर शहराध्यक्ष  रवी सोनार यांनी केले.                  

 सदर कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत हे पंढरपूर तालुका अध्यक्ष प्रविण सुरवसे यांनी केले सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री कैलास कारंडे यांनी केले तर कार्यक्रमातील मान्यवरांची ओळख व त्यांच्या कार्याची माहिती संतोष चव्हाण व सौ ज्योतीताई शेटे यांनी करून दिली. आलेले प्रमुख पाहुणे मा.विश्वजीत घोडके  यांचा सत्कार श्री रामभाऊ बडवे व सौ धनश्रीताई उत्पात यांनी केला.तसेच आलेले मान्यवर सौ धनश्रीताई उत्पात यांचा सत्कार सौ शोभा बडवे व सौ सुवर्णा कुरणावळ तर श्री राम भाऊ बडवे यांचा सत्कार श्री नागेश रहिरकर ,श्री प्रकाश आलदर व  दत्ताभाऊ कमले यांनी केला. सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार पंढरपूर तालुका उपाध्यक्ष  हेमंत भाळवणकर व  कौस्तुभ देशपांडे यांनी केला सदर कार्यक्रमात माननीय  घोडके यांनी सर्वांना योग्य मार्गदर्शन केले व सौ उत्पात मॅडम यांनी संस्थेच्या कार्याविषयी सर्वांना माहिती दिली .शेवटी सर्वांचे आभार संस्थेचे कार्याध्यक्ष  शिवलिंग वसेकर यांनी मानले सदर कार्यक्रमाची सांगता अल्पोउपहार व थंडपेय यांनी झाली सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form