राष्ट्रनिर्माण आदर्श महिला शिक्षिका पुरस्काराने महिला शिक्षिकांचा होणार सन्मान

शिक्षक सहकार संघटनेचे पुरस्कार जाहीर

पंढरपूर प्रतिनिधी :  
जिल्हा परिषद सोलापूर आयोजित जिल्हास्तरीय अधिकारी, कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन  सोलापूर येथे करण्यात आले होते, त्यामध्ये माळशिरस तालुक्यातील शिक्षकांचा सहभाग लक्षणीय होता. त्यामध्ये प्रविण्य मिळवलेल्या प्रतिभावंत कलाकार पुरस्कार दिपाली तापोळे, वनिता शिंदे, प्रिया तोरणे, गिरीजा नाईकनवरे, मारुती जाधव, जगदीश गोडसे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
          अष्टपैलू खेळाडू पुरस्काराने संपत मिसाळ, चंद्रकांत धसाडे, रुपाली आसबे, राबिया शेख तर उत्कृष्ट कलाकार पुरस्काराने आत्माराम गायकवाड, शहजादी काझी यांचा सन्मान होणार आहे. समूहनृत्य, समूहगीत गायन, चित्रपट गीत, गोळा फेक, भाला फेक, खो - खो,100 मीटर धावणे, 1500 मीटर धावणे, वैयक्तिक पारंपारीक गीत नृत्य या स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या बांधवांचा सन्मान होणार असल्याचे प्रसिद्धीप्रमुख दादासाहेब भोसले यांनी सांगितले आहे.

       या कार्यक्रमासाठी मा. खासदार धैर्यशील भैय्यासाहेब मोहिते पाटील, मा. आमदार उत्तमरावजी जानकर साहेब, मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड, राज्यसरचिटणीस निलेश देशमुख, जिल्हाअध्यक्ष रविराज खडाखडे  यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, असे तालुकाअध्यक्ष नागनाथ बळवंतराव यांनी कळविले आहे.
    
विद्यार्थीहीत, समाजहीत, शिक्षकहीत  जोपसणारी संघटना म्हणून शिक्षक सहकार संघटनेची ओळख आहे, शिक्षणक्षेत्रात भरीव, उल्लेखनीय, मोलाची कामगिरी करणाऱ्या महिला शिक्षिकांना राष्ट्रनिर्माण आदर्श महिला शिक्षिका पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये दिलशाद काझी, शीतल वाघ, वीणा पोळ, मंजुषा कांबळे, मंजुषा खताळ, कविता शेळके, सुवर्णा घोरपडे, राणी धायगुडे, सारिका धुमाळ, छाया भोईटे, आश्विनी गोरड, पार्वती भोमाळे, मीनल गाडे, प्रीती देशपांडे, नंदा करे, सुरेखा काळे, उज्वला निकम, सुनीता कोरे, विणा गर्जे, मनीषा गायकवाड, नाहीदअख्तर अजीम चटरकी, सारिका कुदळे, सुनीता पोरे, दमयंती मांडवे, अर्चना वाघ, रुक्मिणी पारसे, रुपाली धोत्रे, फहेमिदा अमहुसेन सय्यद यांचा पुरस्काराने सन्मान होणार आहे, तेव्हा माळशिरस तालुक्यातील  सर्व शिक्षक संघटना समन्वय समिती पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे राज्यकार्याध्यक्ष दिपक परचंडे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form