पंढरपूर तालुक्यातील एकलासपूर गावाची कन्या झाली महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक(PSI)

पंढरपूर प्रतिनिधी--
एकलासपूर गावातील कु. पल्लवी राजेश कवडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उत्तीर्ण होत महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक (PSI) पद घेऊन महाराष्ट्रा मध्ये महिलांमध्ये द्वितीय आली आहे. तिच्या या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण असून, तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
       पल्लवी हिने आपल्या शालेय शिक्षणाची सुरुवात जिल्हा परिषद शाळा एकलासपूर येथे केली, तर उच्च शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपुर मधून पूर्ण केले. पुढे तिने पुणे येथे जाऊन MPSC चे क्लासेस लावले  लहानपणापासून अभ्यासू आणि मेहनती असलेल्या पल्लवी हिने अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवण्यासाठी अथक मेहनत घेतली.त्यासाठी तिला तिच्या आई, वडील, आजोबा यांचे सहकार्य लाभले.
           MPSC परीक्षेची तयारी करताना तिने नियमित अभ्यास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग, शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक तयारी यावर विशेष भर दिला. ग्रामीण भागातील असूनही तिने आपल्या जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले.
        तिच्या यशाने संपूर्ण कुटुंबाचा अभिमान वाढवला आहे. तिच्या आई-वडिलांनी तिला शिक्षणासाठी सातत्याने पाठिंबा दिला. गावातील लोकांनीही तिच्या मेहनतीचे कौतुक करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तिच्या यशाची बातमी कळताच गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात तिचे स्वागत केले. तिच्या घरी आनंदोत्सव साजरा केला जात आहे. ग्रामस्थ आणि शिक्षकांनी सांगितले की, तिच्या या यशाने गावातील इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल.
      एकलासपूर गावातील पल्लवी हिने मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील मुलींना नवी उमेद आणि दिशा देणारे ठरेल. तिच्या जिद्दीने आणि मेहनतीने दाखवून दिले की चिकाटी आणि प्रयत्न केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तिच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form