*कुमठेकर परिवाराकडून श्री. कालिका देवीस शस्त्र व बांगड्या सुवर्ण मुलामा देऊन अर्पण*.


सोलापूर प्रतिनिधी --
येथील  शुक्रवार पेठेतील विश्वब्राम्हण समाज कालिका देवीस आज चैत्र शुद्ध पंचमी दिवशी स्वर्गीय बाळासाहेब रामचंद्र कुमठेकर यांच्या परिवाराकडून सुवर्ण मुलामा देऊन आठ बांगड्या, शंख, नाग, तलवार, परशु, त्रिशूल, डमरू आदि भक्तीभावाने अर्पण करण्यात आले.
 
विश्वब्राम्हण समाज कालिका सेवा मंडळ ट्रस्ट सोलापूर च्या वतीने शुक्रवार पेठ सोलापूर येथील श्री कालिका मंदिर, येथे फाल्गुन कृ.११ शके १९४६ ते चैत्र शुद्ध ५ शके १९४७ मंगळवार दि. २५ मार्च २०२५ ते बुधवार दि. ०२ एप्रिल २०२५ या कालावधीत श्री. कालिका देवी महोत्सवाचे विविध उपक्रमाने आयोजन करण्यात आले होते याचे अवचित्य साधुन कुमठेकर परिवार परिवार यांच्या वतीने सदर सेवा अर्पण केली आहे.
यावेळी जेष्ठ चिरंजीव व मंदिर समिती विश्वस्त श्री. प्रसाद कुमठेकर व त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मी, सौ. अमृता व श्री नंदकुमार कुमठेकर, सौ गौरी व ओंकार कुमठेकर,
चिरंजीव केदारनाथ, अमरनाथ, रुद्र आणि कु. साक्षी आदि कुटुंबीय याप्रसंगी उपस्थित होते. गेल्या वर्षी देखील चैत्र शुद्ध पंचमी स श्री कालिका देवीस सोन्याचा मुलामा दिलेला नवीन किरीट अर्पण केला होता.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form