जि.प.प्रा.शाळा शेगांव दुमाला शाळेतील उपशिक्षिका श्रीमती वैशाली अभिमन्यू वाघमारे कृतीनिष्ठ शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

पंढरपूर प्रतिनिधी-- 
पंढरपूर-काल जि.प.प्रा.शाळा शेगांव दुमाला केंद्र-बाभुळगांव ता-पंढरपूर येथील आदर्श,उपक्रमशिल व विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून सुपरिचित असलेल्या श्रीम.वैशाली अभिमन्यू वाघमारे-कोरे मॕडम यांना छत्रपती शिवाजी सांस्कृतिक व क्रीडा मंडळ मरवडेचेवतीने दरवर्षी देण्यात येणारा अतिशय सन्मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा कृतीनिष्ठ शिक्षिका हा पुरस्कार सौ वनमालाताई भगरे-अध्यक्ष स्व.आप्पा खंडू भगरे सामाजीक ट्रस्ट मरवडे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव प्राध्यापक शिवाजी काळुंगे यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

गेली 25 वर्ष विना प्रसिद्धी अतिशय तनमन धनाने ग्रामीण भागातील गोरगरिबांचे विद्यार्थ्यांंना ज्ञानदान करणाऱ्या सुंदर हस्ताक्षर स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,लेखन-वाचन स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,सामान्यज्ञान स्पर्धा,टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तूची कार्यशाळा,सांस्कृतिक कार्यक्रम खेळातून सहज व आनंदी शिक्षण अशा विविध उपक्रमातून विद्यार्थि घडविणार्या बाभुळगांव केंद्रातील कर्तव्यदक्ष शिक्षिका म्हणून त्याची विधायक अशी ओळख आहे.पंढरपूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री मारुती लिगाडे केंद्रप्रमुखा श्रीम स्वाती डोंगरे मुख्याध्यापक श्री शरद कोळी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

यावेळी सोहळ्या प्रसंगी श्री सुरेश कुलकर्णी मा.शिक्षण सहसंचालक पुणे छत्रपती परिवाराचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार सर शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष राजन सावंत सर  राज्य प्रवक्ते ह.भ.प.रंगनाथ काकडे महाराज* *गटशिक्षणाधिकारी बिभिषण रणदिवे साहेब शिक्षक समिती महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा श्रीम ज्योती कलबुर्मे मॕडम तसेच शिक्षक समितीचे राज्य* *सल्लागार अनिल बंडगर जिल्हा उपाध्यक्ष पोपट कापसे जिल्हा संघटक आण्णासाहेब रायजादे तालुकाध्यक्ष रमेश खारे सरचिटणीस सुनिल अडगळे उपाध्यक्ष नितिन कस्तुरे शिवाजी जाधव मा.चेअरमन दत्तात्रय खंदारे आवेश करकमकर गुंडिबा कांबळे संतोष कापसे हेमंत माने बालाजी शिंदे विजय जाधव मा.व्हा.चेअरमन संतोष कांबळे सचिव संतोष थोरात किरण ढोबळे उदय भुमकर शशिकांत गोरे दादासाहेब खांडेकर शरदचंद्र चटे शामराव जाधव जगन्नाथ ओव्हाळ सर महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा सुरेखा इंगळे तालुका  सरचिटणीस अर्चना कोळी संघटिका सारिका फासे सुजिता गुरसाळकर स्वाती पंचवाडकर स्वाती भुमकर महानंदा सावंत भाग्यश्री अवधूत यांचेसह समस्त कोरे परिवारातील सर्व सदस्य समस्त वाघमारे परिवारातील सर्व सदस्य आदी आप्तस्वकिय,स्नेही मित्र परिवार व शिक्षक समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form