सोलापूर प्रतिनिधी --
विश्वब्राम्हण समाज कालिका सेवा मंडळ ट्रस्ट सोलापूर च्या वतीने शुक्रवार पेठ सोलापूर येथील श्री कालिका मंदिर, येथे फाल्गुन कृ.११ शके १९४६ ते चैत्र शुद्ध ५ शके १९४७ मंगळवार दि. २५ मार्च २०२५ ते बुधवार दि. ०२ एप्रिल २०२५ या कालावधीत श्री. कालिका देवी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्ट चे अध्यक्ष श्री उमेश कुरुलकर व उत्सव समितीचे अध्यक्ष श्री प्रसाद चोळचगुड्ड यांनी दिली.
दिनांक २५ मार्च ते ०२ एप्रिल या काळात दररोज संध्याकाळी ०५:००ते रात्रौ ०८:३० पर्यंत वृंदावन वाशी येथील पंडित श्री. नवल किशोर शास्त्रीजी महाराज यांच्या सुमधुर रसाळ वाणीत देवी भागवत सप्ताह संपन्न होणार आहे. तसेच दि. २५ मार्च रोजी सकाळी ठीक ०८:०० वाजता सौ. व श्री. ओंकार सुभाष महामुनी वालचंदनगर यांचे शुभ हस्ते उत्सवमूर्तीची स्थापना व ग्रंथ पूजा तसेच सौ प्रतिभा महामुनी, सौ शैलजा कुरुलकर व कु. रेखा जोशी यांचे मार्गदर्शना खाली श्री दुर्गा सप्तशती पाठाचे सकाळी ०९ ते दु. १२:३० या वेळेत आयोजन केलेले आहे. दैनंदिन नित्य पूजा श्री नागेश कुरुलकर यांचे हस्ते होईल. दि. २८ मार्च रोजी दुपारी ०१ ते ०३
या वेळेत कुंकूमार्चंन होणार आहे. याच वेळी अध्यक्ष श्री उमेश कुरुलकर यांचेकडून उपस्थित भाविकांना प्रसादरूपी अल्पोपहारची व्यवस्था करण्यात आली आहे. दि. ३१ मार्च रोजी श्री देवीस सकाळी ०८:३० ते ०९:३० या वेळेत रुद्रा भिषेक करण्यात येणार आहे. दि. ०१ एप्रिल रोजी दु.०४:०० ते सांय. ०८:०० या वेळेत नवचंडी यज्ञाचे आयोजन केले असून यजमान पद सौ. व श्री. ओंकार महामुनी वालचंदनगर हे भूषविणार आहेत. दि. ०२ एप्रिल रोजी सकाळी ०८:०० ते ११;०० वेळेत श्री कालिका देवी पालखी मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून होईल. पालखी मंदिरात आल्यानंतर कालिका देवीस अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव दु. १२:०० ते ०२:०० यावेळेत होणार आहे. तसेच दुपारी ०२:००ते ०४:०० ह्यावेळेत महाप्रसादाचे आयोजन केले आहे श्री कालिका देवींची महाआरती सौ व श्री सुभाष महामुनी वालचंदनगर यांचे हस्ते होईल.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष श्री उमेश कुरुलकर, यांचे मार्गदर्शना खाली उत्सव समिती अध्यक्ष श्री प्रसाद चोळचगुड्ड सर्व पदाधिकारी, विश्वस्त परिश्रम घेत आहेत. तरी सर्व भाविक भक्त व समाज बांधवानी लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्ट कडून करण्यात आले आहे.
Tags
सामाजिक वार्ता