गुन्ह्याची उकल उत्तम पद्धतीने केल्याने पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांच्यासह सहकाऱ्यांना बेस्ट डीटेक्शन अवॉर्ड देऊन केला गौरव...

पोलिस निरीक्षक टी वाय मुजावर यांच्यासह सहकाऱ्यांना बेस्ट डीटेक्शन अवॉर्डने सन्मान.   

पंढरपूर (प्रतिनिधी )
पंढरपूर तालुका पोलिसांनी दरोड्याच्या  गुन्ह्यात योग्य दिशेने तपास करीत तीन आरोपींचा जेरबंद केल्याबद्दल पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांच्यासह सहकाऱ्यांना  गुरुवार दि.१३ फेब्रूवारी रोजी बेस्ट डीटेक्शन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.

मध्य प्रदेश पासिंगची पिकप गाडी क्रमांक एम पी ०९ एस३०१० या गाडीच्या चालकाला चाकूचा धाक दाखवून चालकाला लाथा बुक्क्याने मारहाण करून पिकप गाडी जबरदस्तीने चोरून  एकूण ११ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज घेऊन आरोपी पळून गेले होते. 

सदर गुन्ह्यामध्ये आरोपीच्या वर्णनावरून एकूण तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले होते. त्यांनी तपासात सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली होती .आरोपी गोविंद लिंबा पवार वय २३ वर्ष राहणार अंकोली तालुका मोहोळ, निबाल अहमद शेख वय २१ वर्ष राहणार चिंचोली तालुका पंढरपूर  संच्या मिटकरी वय ३२ राहणार आंबे चिंचोली तालुका पंढरपूर असे तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते.  त्यांच्याकडून फिर्यादीचे दोन मोबाईल फोन एक पिकप गाडी  क्रमांक एम पी  ०९ एस ३०१० एकूण किंमत रुपये ११ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून आरोपींना अटक केली होती. सदर गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही तासांतच आरोपींना अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,  अप्पर पोलीस अधीक्षक  प्रीतम यावलकर   उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर पीएसआय  भोसले . हेडकॉन्स्टेबल गजानन माळी , विनायक क्षीरसागर, ए एस आय तोंडले , हेडकॉन्स्टेबल रोकडे पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी पोलीस कॉन्स्टेबल आवटी यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form