पर्यटनामध्ये सेवा आणि मूल्य सुसंगत असले पाहिजे - - अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह

चिंचणी प्रतिनिधी 
 पर्यटन संचलनालय, पुणे, असेन्सिव्ह एज्युकेअर लि. (राष्ट्रीय कौशल्य विकास यंत्रणा) यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र येथे  मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये 40 महिला व पुरुषांनी सहभाग घेतला आहे. पर्यटन आणि आदरातिथ्य कौशल्य या बाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.यामधून पर्यटकांसोबत संवाद, आदरातिथ्य, स्वागत,काळजी घेणे इ.प्रशिक्षण दिले जाणार आहे.
यावेळी बोलताना अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह म्हणाल्या की पर्यटनामध्ये सेवा आणि मूल्य सुसंगत असले पाहिजे.यामुळे पर्यटकांना आनंद मिळून पर्यटन केंदाला उत्पन्न मिळण्यास मदत होते.यापूर्वी आपण प्रशिक्षण न घेता ही ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र अतिशय उत्तम चालवून एक आदर्श निर्माण केला आहे. परंत येथील महिला व पुरषांना प्रशिक्षित करणे आवश्यक असल्यामुळे हा कार्यक्रम व्हिसा यांनी आयोजित केला आहे. या प्रशिक्षणामध्ये 40 प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला असून हे प्रशिक्षण देण्यासाठी सूर्या मुखर्जी जनरल मॅनेजर, सत्यजित हे सीनियर ट्रेनर पाच दिवस ट्रेनिंग देणार असून पाचव्या दिवशी परीक्षा होऊन नंतर या सर्वांना प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे.यावेळी निवासी जिल्हाधिकारी मा.मनिषा कुंभार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी अंजली मरोड उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form