पंढरीत मनसेच्या वतीने स्व.आ.भारत भालके यांची जयंती साजरी.....मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना मिष्ठान्न भोजन


पंढरपूर /प्रतिनिधी 
लोकनेते स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या ६५ व्या जयंती विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरी केली जात आहे. जयंतीचे औचत्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या वतीने गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले.
याप्रसंगी स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
 
याप्रसंगी बोलताना दिलीप धोत्रे म्हणाले की गोरगरीब व सामान्य नागरिकांसाठी भारतनानांचे कार्य मोठे आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा पाईक म्हणून पुढील काळात भारतनानांचे स्वप्न साकार करण्यासाठी पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम केली जाईल असे अभिवचन देत. धोत्रे यांनी जयंतीजयंतीनिमित शहर व तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी माझे कार्यालय सदैव खुले राहील येणाऱ्या जनतेला मदत करण्याचे काम केले जाईल असा संकल्प दिलीप धोत्रे यांनी केला.
यावेळी कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते अरुण कोळी, मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, एडवोकेट संदीप रणनवरे, मनसेचे गणेश  पिंपळनेरकर, दत्ता वलेकर ,आदिनाथ भोसले,प्रदीप परचडे, सुरज देवकर, आकाश बंदपट्टे, ओंकार पिसे, अनिल सपताळ आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form