श्री संत शिरोमणी नरहरी सोनार यांचा ७३९ वा समाधी सोहळ्याचे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी --
सालाबादप्रमाणे  याहीवर्षी श्री संत शिरोमणी नरहरी सोनार यांच्या ७३९ वा समाधी सोहळा श्री संत नरहरी सोनार समाज सेवा मंडळ,विजापूर रोड, सोलापूर या संस्थेच्या वतीने मित्ती माघ कृष्ण तृतीया शके १९४६ शनिवार दि. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री महालक्ष्मी कल्याण मंडप, आय.टी.आय. च्या पाठीमागे, विजापूर रोड, सोलापूर येथे करण्याचे योजिले आहे.

सदर समाधी सोहळा कार्यक्रम शनिवार दि. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते १० श्री संत नरहरी सोनार यांच्या प्रतिमेचे पूजन,सकाळी १० ते १२ गुलालाचे किर्तन ह.भ.प. शिवाजी महाराज पोतदार साथसंगत श्री विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, शेळगी दुपारी १२ ते १२.३० गुलाल व पुष्पवृष्टी दुपारी १ नंतर महाप्रसाद तरी सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाच्या विश्वास्थांनी  आवाहन केले आहे.या समाधी सोहळा निमित्त रक्तदान  शिबीराचे आयोजन केलेले आहे.तरी समाज बांधवांनी आपली नावे प्रशांत महामुनी व मिलिंद पंडीत यांचेकडे नोंदवावीत असे कळविण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form