मंगळवेढ्यातील विविध पदाधिकारीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अनिल सावंतांना पाठिंबा देत केला पक्ष प्रवेश..

मंगळवेढा प्रतिनिधी --
आज मंगळवेढ्यात अनिल सावंतांची ताकद वाढली; शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश करत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला.देगांव गावाचे ग्रामदैवत मायक्काचे दर्शन घेऊन संवाद सभेचे नियोजन करण्यात आला होती 

 मंगळवेढा तालुक्यातील देगांव या गावाला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ गावभेट दौरा वेळी पक्षप्रवेश विलास बनसोडे, बालाजी ढेकळे, संतोष डोईफोडे (ग्रामपंचायत सदस्य) हनुमंत बनसोडे (सरपंच) कांतीलाल दुधाळ, मल्हारी ढेकळे, सचिन चौगुले, काशीलिंग बनसोडे, राजाराम डोईफोडे, गंगाराम मोरे, संजय बनसोडे, दत्ता डोईफोडे, केराप्पा ढेकळे, भागवत ढेकळे, दत्ता गोरे या सर्व पदाधिकारी सामाजिक कार्यकर्त्यांनी  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्नाटक राज्याचे प्रदेशाध्यक्ष CS इनामदार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून अनिल सावंत यांना जाहीर पाठिंबा दिला.

देगांव गावाचे ग्रामदैवत मायक्काचे दर्शन घेऊन सभेला सुरुवात करण्यात आली. 
मायक्का मंदिरामध्ये संवाद सभा पार पडली. सभेमध्ये अनिल सावंत यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.अनिल सावंत म्हणाले, आतापर्यंत पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पाणी प्रश्नावर झाली.पाणी प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे.मात्र किती दिवस आपण याच प्रश्नावर निवडणूक लढणार आहोत.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे कर्नाटक राज्याचे प्रदेशाध्यक्ष CS इनामदार, आणि महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.येणाऱ्या काळात निश्चितपणे पाणी प्रश्न कायमचा सोडवला जाईल. याशिवाय पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात मोठ मोठे उद्योगधंदे, शिक्षण संस्था, आयटी हब करण्याचं माझं स्वप्न आहे. सभेनंतर देगांव गावातील विविध पदाधिकारी, आजी माजी सरपंच  ग्रामपंचायत आजी, माजी सदस्यांनी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये पक्षप्रवेश केला.


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form