या बंधुंनो या हो, सद्गुरु चरणी धावत या । आपले सुखाचे आवडी या, शाश्वत सुखाचे आवडी या ।। अभिमान टाकूनी या, मी पण सोडून या । या बंधुंनो या हो या, सद्गुरु भजनी धावत या ।।
सोलापूर प्रतिनिधी --
देवसागर साधक समाज इंचगिरी सांप्रदाय स.स. बाळकृष्ण महाराज सोलापूर साधकां
तर्फे समस्त भक्त भाविकांना कळविण्यास येते की प्रतिवर्षाप्रमाणे अनंत कोटी ब्रम्हांड नायक श्री.स.स.बाळकृष्ण महाराज यांच्या सोलापूर साधकांतर्फे श्री चा हरिनाम सप्ताह सोमवार दि.११नोव्हेबंर ते बुधवार दि.१३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सदरच्या सोहळ्याला श्री क्षेत्र नंदेश्वर येथील सदगुरु माऊलीचे गुरुभक्तीचे स्फूर्तीस्थान श्री सद्गुरु बाळासाहेब महाराज, नंदेश्वर यांचे सोमवार दिनांक ११नोव्हेंबर २०२४ रोजी आगमन होत आहे. या हरिनाम सप्ताहास आपण सर्वांनी ज्ञानामृताचा आणि श्री दर्शनाचा लाभ घ्यावा व आपला पारमार्थिक आनंद द्विगुणित करावा.तसेच या कार्यास अनुभवी संत महात्मे येणार आहेत.
तसेच दररोज पहाटे ५ वा. काकड आरती, "श्री" ची पूजाअर्चा असुन सकाळी वेळ ७ ते ८ भागवत वाचन व ध्यान, दुपारी भजन, सायंकाळचे भजन व रात्री बारा अभंग ९ ते ११ आणि दररोज दुपारी विविध भजनी मंडळीचे भजनाचा कार्यक्रम वेळ ३ ते ५ असा कार्यक्रम रुपरेषा ठरवली आहे.तर शुक्रवार दिनांक १३नोव्हेबर रोजी १०ते१२ यावेळी बाळासाहेब महाराज यांचे प्रवचन कार्यक्रम आहे.तर दुपारी महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजकांनी सांगितले आहे.
Tags
धार्मिक वार्ता