आमदार समाधान आवताडे यांच्या गावभेट दौऱ्यास पंढरपूर येथील महायुतीतील घटक पक्षांचे नेते सक्रिय...

आमदार समाधान आवताडे यांच्या गावभेट संवाद दौऱ्यास उस्फुर्त प्रतिसाद...
पंढरपूर प्रतिनिधी--
महायुतीचे उमेदवार आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर तालुक्यातील गावभेट संवाद दौरा सुरू असून त्यांनी यावेळी महायुती सरकारच्या माध्यमातून  राबवलेल्या योजना व विविध विकासाच्या धोरणांच्या माध्यमातून झालेली गावातील लोक
कल्याणकारी विकास कामे जनतेसमोर मांडत उपस्थितांशी आ.समाधान आवताडे यांनी हितगुज करत संवाद साधला.गावाचा विकास हीच समाजकारणाची मुख्य प्रेरणा मानून,आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे मूलभूत सुविधा गावात आणण्यात यश मिळाले आहे. पुढील काळात आपण अधिकाधिक प्रगतीच्या दिशेने काम करू. शेतकरी बांधवांसाठी अधिकाधिक अनुदान योजना, महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी, तरुणांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी २० तारखेला ‘कमळ’ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड जनाशीर्वादाने निवडून द्यावे, असे आवाहन या निमित्ताने त्यांनी केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, सततच्या पाठपुराव्याने गावातील पूर्ण झालेल्या व सुरु असलेल्या विकास कामांच्या माध्यमातून जनतेचा मतरुपी आशीर्वाद मिळवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या गावभेट प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने भाजप महायुती व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधानदादा आवताडे व मा.आमदार प्रशांतजी परिचारक (मालक) यांनी गावांना भेट दिली.
 
सदर प्रसंगी महायुतीचे सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी,सहकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form