वेणुनगर, दि. २५-
वेणुनगर-गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व धुरंधर राष्ट्रीय नेते भारताचे माजी उपपंतप्रधान कै. यशवंतराव चव्हाण यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे पुर्णाकृती पुतळ्याची विधीपुर्वक पुजा संचालक श्री सिध्देश्वर बंडगर यांचे शुभहस्ते व कारखान्याचे संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
सदर कार्यक्रमास कारखान्याह संचालक सर्वश्री दिनकर चव्हाण, प्रविण कोळेकर, कार्यकारी संचालक
आर.बी. पाटील, तसेच कारखान्याचे सभासद, कार्यकर्ते, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार, सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व संचालक व मान्यवरांनी याप्रसंगी कै. यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली वाहिली,
Tags
सहकार वार्ता