माझा पराभव झाला असला तरी,मायबाप जनतेच्या पाठीशी उभं राहणार....
पंढरपूर प्रतिनिधी --
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात जरी माझा पराभव झाला असला तरीही ज्या मायबाप जनतेने एक लाख पेक्षा जास्त मते दिली त्यांच्यासाठी २४ तास माझे कार्यालय सुरू राहील असे भगीरथ भालके यांनी रविवारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
कालच पंढरपूर मंगळवेढा येथील विधानसभा निवडणुकीत त्यांचा आठ हजार ४३० मतांनी पराभव झाला. यानंतर निराश न होता लगेच भालके यांनी पुढील काळात काय करायचे ही आपली भूमिका पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केली. ते म्हणाले, मी या निवडणुकीत झालेला पराभव स्वीकारला आहे. मागील पोटनिवडणुकीपेक्षा जास्त मतदान यावेळी झाले. एक लाख १६ हजार ८३३ एवढी मते मला पडली आहेत. आता अनेकजण दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण मी जनतेच्या सेवेत राहणार आहे कधीही हाक द्या, महाविकास आघाडीच्याच काही लोकांनी पायात पाय घालण्याचा प्रयत्न केला आहे. पण आम्ही स्वाभिमानाची लढाई लढलो आहे.
ज्यांना साडेतीन वर्षात अनेक त्रास झाला त्याच लोकांनी पुन्हा निवडून दिले आहे. आता पाच वर्षे त्यांना सोसावे लागणार आहे. खासदार प्रणिती शिंदे सोडल्या तर माझ्या पाठीशी कुणीही नव्हते.केवळ जनताजनार्दन पाठीशी होती.आपला गट कायम राहणार असून आगामी काळात नगरपालिका,जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुका लढविणार असल्याचे भालके यांनी सांगितले.यावेळी सुधीर धोत्रे, संजय बंदपट्टे, किरण घाडगे तसेच भालके गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
राजकीय वार्ता