श्री विठ्ठल कारखान्यावर कर्मवीर औदुंबरआण्णांची १०१ वी जयंती साजरी


वेणुनगरः दि.२३-
 पंढरपूर तालुक्यातील वेणुनगर-गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे संस्थापक चेअरमन कर्मवीर कै. औदुंबररावजी (आण्णा) पाटील यांची १०१ वी जयंती साजरी करण्यात आली.

या प्रसंगी कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर कै. औदुंबररावजी (आण्णा) पाटील यांचे पुर्णाकृती पुतळ्याची विधीपूर्वक पुजा कारखान्याचे चेअरमन आमदार श्री अभिजीतआबा पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले.

सदर कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे, तसेच संचालक सर्वश्री सुरेश भुसे, सचिन वाघाटे, प्रविण कोळेकर, विठ्ठल रणदिवे, तज्ञ संचालक दशरथ जाधव, अंगद चिखलकर, समाधान गाजरे, कार्यकारी संचालक श्री आर. बी. पाटील, जनरल मॅनेजर श्री डी. आर. गायकवाड, श्री विठ्ठल प्रशालेचा सर्व स्टाफ तसेच कारखान्याचे सभासद, कार्यकर्ते, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार, सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व संचालक व मान्यवरांनी याप्रसंगी कर्मबीर औदुंबररावजी (आण्णा) पाटील यांना आदरांजली वाहिली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form