सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणीला धावून जाणारा नेता--दिलीप धोत्रे

पंढरपूर प्रतिनिधी--
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचारसभांना मंगळवेढा तालुक्यातील विविध ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणीला धावून जाणारा नेता म्हणून मतदार संघात त्यांची ओळख असल्याने त्यांचे ठिक
ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे.त्यांनी मंगळवेढा विविध गावांमध्ये जनतेशी संवाद साधताना मंगळवेढा येथील विविध प्रश्नांवर संवाद साधताना त्यांनी मतदारांशी हितगुज साधला.

मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केलेल्या कामाच्या जोरावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील पहिली मनसेची उमेदवारी जाहीर केली त्यामुळे गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत
पोहोचण्यात ते यशस्वी झाले आहेत. निवडणूक प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा घेऊन त्यांनी प्रचारातही त्यांनी आघाडी घेतली आहे.

राजकारणाबरोबरच त्यांनी समाजकारणाम ध्ये मोठे योगदान दिले आहे.मतदार संघातील नागरिकांना देव देवतांचे दर्शन घडावे यासाठी विविध यात्रेचे आयोजन करून हिंदू बांधवांना देव देवतांचे दर्शन घडवले होते.यानंतर त्यांनी मुस्लिम बांधवांसाठी अजमेर यात्रा आणि बौद्ध बांधवांसाठी नागपूर दीक्षाभूमी यात्रेचे आयोजन करून दर्शन घडवले होते. सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे नेते आहेत.यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचा मतदार विजयी करतील असे संकेत मिळत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form