माळशिरस प्रतिनिधी --
इतकी वर्षे जनतेचे आमदार असणारे उत्तमराव जानकर आता खऱ्या अर्थाने संविधानिकरित्या आमदार म्हणून निवडुन आले.या यशाचं श्रेय ते माळशिरस तालुक्यातील मतदार संघातील जनतेचे असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
एकहाती लढत दिलेल्या राम सातपुतेंनी १६ व्या फेरीपर्यंत आपल्या मतांची आघाडी कायम ठेवण्यात यश मिळवले. सुरूवाती पासूनच राम सातपुते यांनी मातधिक्य घेण्यास सुरूवात केल्यामुळे राम सातपुतेंनी तुतारीची धाकधुक वाढवली होती. परंतु जसजसे अकलूज पासुन पुर्वे कडील गावे सुरू झाली तसतशी उत्तम जानकर यांचे मताधिक्य वाढत गेले आणि सरते शेवटी जानकरांना वेळापूर परिसरातील गावांनी मोलाचे मताधिक्य देवून विजयाची माळ जानकरांच्या गळ्यात घातली.
११ व्या पेरीअखेर सातपुते यांना ८ हजार ५३० मताधिक्य होते. त्यानंतर माळशिरस पुढील गावांची मोजणी सुरू झाली.त्यानंतर सातपुते यांचे मताधिक्य हळु हळु कमी होऊ लागले. १७ व्या पेरीमध्ये सातपुतेंचे
मताधिक्य संपुन जानकरांना ९० मतांची आघाडी मिळाली. तेथुन पुढे २५ व्या पेरीपर्यंत जानकरांची आपले मताधिक्य अबाधित ठेवत सुमारे १३ हजार १४८ मतांनी सातपुते यांच्यावर विजय संपादन केला. माळशिरस विधानसभा निवडणुकीसाठी एकूण २ लाख ४० हजार ८५१ इतके मतदान झाले. यामध्ये राम सातपुते यांना १ लाख ८ हजार ५७ मते मिळाली तर उत्तमराव जानकर यांना १ लाख २० हजार ३२२ मते मिळाली आहेत.
Tags
राजकीय वार्ता