मोहोळ प्रतिनिधी --
वर्षानुवर्षेची मोहोळ मतदारसंघातील असलेल्या एकाधिकारशाहीला मोहोळ विधानसभा मतदार संघातील जनतेने मोडून काढत राजू खरे यांना मतदारांने भरघोस मतांनी विजयी केले.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार यशवंत माने यांचा तब्बल सुमारे ३० हजार मतांनी पराभव करून राजू खरे यांनी शरद पवार यांची तुतारी वाजवली. त्यांचा विजय सर्व सामान्य जनतेच्या मतदान रुपी आशिर्वाद मिळाल्याने निर्विवाद विजयी कौल मिळाला.
यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोषला केला.यशवंत माने आणि राजन पाटील यांच्या एकाधिकारशाही विरोधात हा लढा असल्याचे चित्र राजू खरे यांनी सुरुवाती
पासून उभे केले होते.आणि एकहाती असणारी सत्ता संपुष्टात आणून ते राजु खरेनी खरे करून दाखवले.या दुरंगी लढतीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे यांनी ३० हजार २०२ मतांनी विद्यमान आ.यशवंत माने यांचा पराभूत करून दणदणीत विजय मिळवला.
महाविकास आघाडीतील नेत्यांची झालेली ऐकी, मोहोळ मतदारसंघातील सर्व जनता एकवटली.त्यामुळे या विजयाचे सर्व श्रेय मोहोळ तालुक्यातील पीडित जनतेचे आहे. आज खऱ्या अर्थाने मोहोळ तालुक्याच्या स्वातंत्र्याची पहाट उगवली आहे.मागील ३०-४० वर्षापासूनचा रखडलेला विकासाला उद्यापासून प्रारंभ होईल.राजू ज्ञानू खरे, विजयी उमेदवार विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाची शिल्पकार ठरली.असा विश्वास त्यांनी यावेळी जनतेने व्यक्त केला.
Tags
राजकीय वार्ता