पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघावर पुन्हा एकदा भाजपचे उमेदवार समाधान आवताडे विजयी

पंढरपूर प्रतिनिधी--
 २५२ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघावर पुन्हा एकदा भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी काँग्रेसचे प्रतिस्पर्धी उमेदवार भगीरथ भालके यांचा ८४३० मताधीक्यांनी पराभव केला आहे. समाधान अवताडे यांनी या मतदारसंघात दुसऱ्यांदा विजयी सलामी देत एकूण १,२५,१६३ इतकी मते मिळवली आहेत. 
मतमोजणी केंद्रा बाहेर अवताडे आणि परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत गुलालाची उधळण करत विजय साजरा केला. मतदान केंद्राबाहेर विजयी उमेदवार समाधान अवताडे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की आज पंढरपूर मंगळवेढा मायबाप जनतेच्या खऱ्या अर्थाने भावना मतपेटीतून पाहायला मिळाल्या याचा अतिशय आनंद होतोय या मतदार संघाची सेवा करण्याची संधी मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून दुसऱ्यांदा दिली आहे. 

यासाठी मायबाप जनतेचे मनापासून आभार मानतो असे सांगितले. मतदारसंघातीलअपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा संधी दिली आहे.महायुतीच्या घटक पक्षांचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी व सर्व सामान्य जनतेचे मी मनःपुर्वक आभार मानतो असे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form