भैरवनाथ शुगर'चे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून पंढरपुरात आज 'नोकरी महोत्सव'

पंढरपूर प्रतिनिधी--
पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील सुशिक्षित तरूण-तरूणींना नोकरीच्या संधी मिळाव्यात, यासाठी रविवारी (दि.६)आज सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत येथील श्री संत तनपुरे महाराज मठात 'नोकरी महोत्सव' आयोजित करण्यात आला असल्याची माहिती 'भैरवनाथ शुगर'चे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांनी दिली. 
'शिकलेल्यांचा सन्मान, देऊ सुशिक्षितांना काम' हे ध्येय ठेऊन आपण कार्यरत असून इ.५ वी १२ वी तसेच विविध पदवी, पदविका, अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या तरूण-तरूणींना चांगल्या रोजगाराच्या संधी मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.
यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील ५० पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांना 'नोकरी महोत्सवात' सहभागी केले आहे. त्यांच्या माध्यमातून अनेकांना नोकरी उपलब्ध होणार असून इच्छुकांनी नांव नोंदणी करावी. ५ प्रतीत वैयक्तीक माहिती, शैक्षणिक कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन अनिल सावंत यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form