आज पंढरपूर मनसे नेत्या शालिनीताई ठाकरे यांच्या हस्ते नवनिर्माण सेनेचे शिक्षक शिक्षकेतर राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण...

 पंढरपूर(प्रतिनिधी):-
 महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेत्तर सेनेच्यावतीने राज्यस्तरीय उपक्रमशिल संस्था, उपक्रमशिल शाळा, राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक आणि गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी अशा ३२ जणांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
आज रविवार दिनांक ६ ऑक्टोंबर रोजी दुपारी २ वाजता शेठ मोरारजी कानजी सभागृह- स्टेशन रोड पंढरपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सहकार सेनेचे राज्य अध्यक्ष दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शालिनीताई ठाकरे यांच्या हस्ते आणि मनसे शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष संजय चित्रे,मनसे नेते राजा चौगुले, मनसे नेते बाबू वागस्कर, पुणे शहर मनसे महिला अध्यक्ष वनिता वागस्कर, मनसे शिक्षक सेनेचे प्रदेश सरचिटणीस जयवंत हक्के, उपाध्यक्ष संतोषकुमार घोडके, मनसे लोकसभेचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांत इंगळे, मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण सन्मानपूर्वक केले जाणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष व निवड समितीचे सदस्य विनायक महिंद्रकर यांनी  दिली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form