खरे यांचेकडून तारापूर नाला येथील सपाटे शाळेला 200बेंचेसची मदत
पंढरपूर प्रतिनिधी--
मोहोळ विधानसभा राखीव मतदार संघाचे फिक्स उमेदवार, उद्योजक राजू खरे यांच्याकडून पंढरपूर तालुक्यातील ताई सपाटे शिक्षण संकुल तारापूर नाला या शाळेसाठी तब्ब्ल 200 बेंचेसची मदत करीत विद्यार्थ्यांना उत्तम सोय करण्यात आली आहे.
शनिवारी पार पडलेल्या या बेंचेस वाटप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सोलापूरचे माजी महापौर आणि खा. शरद पवार यांचे अत्यंत विस्वासू नेते मनोहर सपाटे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून उदयोजक राजू खरे होते. यावेळी विविध मान्यवर व्यासपीठावर होते.
यावेळी बोलताना सपाटे यांनी अगदी स्पष्टपणाने आपली भूमिका गावातील नागरिकांसमोर मांडली. यामध्ये आपला माणूस म्हणून कायम मी खा. शरद पवार यांच्याच सोबत राहिलो आहे. यापुढेही कायम राहणारच आहे.आपण पवारनिष्ठ असल्यानेच मोहोळ विधानसभा मतदार संघातून राजू खरे यांच्यासारखा कर्तव्यदक्ष आमदार होण्यासाठी आपण योग्य ती भूमिका घेणार असून, खरे यांना निवडणुकीत सहकार्यच करणार असल्याचे जाहीरपणे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्योजक राजू खरे यांनीही आपल्या भाषणातून मोहोळ तालुक्याचा विकास फार पूर्वी होणे अपेक्षित असल्याचे सांगत, या भागातील विद्यार्थ्यांसाठी मेडिकल आणि इंजीनियरिंग महाविद्यालय निघाले नाही. उलटअंशी मोहोळ शहरातील विकास होण्याऐवजी येथील महत्त्वपूर्ण अशी शासकीय कार्यालय अनगरकडे घेऊन जाण्याचे महापाप ज्यांनी केले आहे. त्यांना या आगामी विधानसभा निवडणुकीत मोहोळच्या मतदारकडून नक्की मूल्यमापन केल्याचे दिसून येईल. मोहोळ मतदार संघातील जोडलेला आहे. विकास खुंटलेला आहे. मागील पाच वर्षापासून आपण या मतदारसंघातील जनतेच्या विकासासाठी अनेक ठिकाणी विकास केला आहे. हा विकास त्या भागातील जनतेला चांगला ठाऊक झाला आहे. सत्ता आहे सुख सोयीचे साधन आहे. त्यामुळे त्यासाठी फारसे महत्वाचे नसून आपल्या हातून चांगली समाजसेवा घडत असताना, आमच्या मनाला जे समाधान लाभत आहे.ते फार मोठे आहे. फार पूर्वीपासून 20टक्के राजकारण, आणि 80 टक्के समाजकारण करत आलो असल्याचेही उद्योजक राजू खरे यांनी यावेळी सांगितले आहे.
मागील काही महिन्यापूर्वी याच तारापूर गावातील दुसऱ्या शाळेसाठी आपण बेंचेस दिले होते. यानंतर आता या शाळेसाठी ही बेंचेसचे वाटप केले आहे. यासह मोहोळ विधानसभा मतदारसंघातील विविध शाळांनाही आपली मोठ्या प्रमाणात मदत सुरू आहे. यामुळेच शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये होत असलेला आनंद आज माझ्या भावी जीवनातील मोठा आशीर्वाद ठरणार असल्याचेही खरे यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाच्या वेळी प्राचार्य महंमद शेख सर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने सर, सरपंच पांडुरंग परकाळे, सौदागर खडके, अरुण बनसोडे, गणेश नामदे, कुंडलिक डोंगरे, सौदागर गायकवाड, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष छगन पवार, शिवसेनेचे विलास चव्हाण, आरपीआयचे लक्ष्मण गायकवाड, भीम टायगर सामाजिक संघटनेचे लखन घाटे, संजय, समाधान बाबर, बालाजी वाघ, कृष्णा वाघ, संजय परकाळे, कृष्णाजी मदने, महादेव माने, बाळासाहेब सपाटे,मधुकर सपाटे, एड. समाधान गाडे यांचे सह पंढरपूर,उत्तर सोलापूर आणि मोहोळ भागातील सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि उद्योजक राजाभाऊ खरे, वरील शाळेतील सर्व शिक्षक स्टॉप कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
➖➖➖➖
*60 लाखाचे विकासकामाचा शुभारंभ*
मोहोळ मतदार संघातील पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे जवळपास 60 लाख रुपयेची विकासकामे उद्योजक राजू खरे यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आली होती. यातील काही कामांचा शुभारंभही शनिवारी खरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तारापूर आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
राजकीय वार्ता