ओबीसी हक्क परिषदचे महाराष्ट्र राज्यतर्फे जाहीर निषेध....माजलगाव चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी कठोर कारवाईची मागणी...

सोलापूर प्रतिनिधी --
बीड जिल्हा माजलगाव शहरात एका साडेपाच वर्षाच्या चिमुरड्यांवर अत्याचार प्रकरणी अहमदपुर पोलिस प्रशासनाने आरोपीस तात्काळ अटक करून कारवाई करावी तसेच त्याला फाशीची शिक्षा ठोठवावी यासाठी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांना भेटून निवेदन देण्यात आले व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  याची योग्य दखल घ्यावी व आरोपीस कठोर शिक्षा व्हावी असे निवेदन देण्यात आले अशी माहिती ओबीसी हक्क परिषदचे महाराष्ट्र राज्य महिला प्रदेश अध्यक्ष माधवी पोतदार यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.


माजलगाव शहरात एका साडेपाच वर्षाच्या चिमुकल्या मुली वर अत्याचार करण्यात आला आहे त्याचा निषेध म्हणुन संपुर्ण महाराष्ट्रात निवेदन, कामकाज बंद आंदोलन सराफ व सुवर्णकार असोशियन यांच्या वतीने करण्यात येणार आहे.एक दिवसीय सराफा व सुवर्णकार मार्केट बंद ठेऊन मूक मोर्चा काढून निषेध करण्यासाठी व त्या आरोपीला फाशीची शिक्षा दयावी या मागणी करण्यात येणार आहे.तसेच याबाबत संपुर्ण महाराष्ट्रातील जिल्हाअधिकारी,तहसीलदार, प्रांत अधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री गृहमंत्री यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

यावेळी ओबीसी हक्क परिषद दिल्ली महिला प्रदेश अध्यक्षा  माधवी पोतदार, पश्चिम महिला अध्यक्षा माधूरी डहाळे, सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा  मनीषा पंडित, सोलापूर शहर अध्यक्ष प्रकाश कटारे, सोलापुर जिल्हा सचिव संतोष सुतार, महाराष्ट्र प्रदेश संघटक  काशिनाथ पोतदार आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form