नाशिक (प्रतिनिधी) -
केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेला *मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस* चा *नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट रेल्वे टर्मिनस नामविस्तार* प्रस्ताव राज्य विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंजूर करण्यात यावा तसेच संपूर्ण भारतातील सर्व रेल्वे स्थानकांवर नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय घेऊन केंद्र शासनाने केवळ *भारतीय रेल्वे* चे शिल्पकार नव्हेत, तर *आशियायी रेल्वेचे जनक* असलेल्या नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांना मरणोत्तर *भारतरत्न पुरस्कार* देखील मिळावा, अशी आग्रही मागणी *नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट प्रतिष्ठान मुंबई* चे सरचिटणीस ॲड मनमोहन चोणकर आणि अन्य पदाधिकारी, *सकल भारतीय सोनार समाज संघटन* चे संस्थापक मिलिंद कुमार सोनार, *ऑल इंडिया सोनार फेडरेशन* चे सर्व पदाधिकारी, तसेच *सेतुबंधन* मधील विविध सोनार समाज संस्था आणि संघटना यांच्यातर्फे करण्यात आली आहे.
Tags
सामाजिक वार्ता