चळे(दि.9) राजेंद्र फुगारे
चळे तालुका पंढरपूर येथील जगदंबा नवरात्र तरुण मंडळ बरड वस्ती यांनी सामाजिक बांधिलकी जपत मंगळवार दि.8 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.मंडळाचे हे आठवे वर्ष आहे.
अक्षय बल्ड बँक सोलापूर,शाखा पंढरपूर यांनी रक्त संकलन केले.या शिबिरामध्ये
59 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक उत्तम रामा वाघ यांच्या हस्ते झाले.यावेळी मंडळाचे मार्गदर्शक श्रीनिवास बनसोडे, मंडळाचे अध्यक्ष अक्षय गायकवाड,उपाध्यक्ष हनुमंत बनसोडे यांच्यासह माजी सरपंच औदुंबर सारीक,माजी ग्रामपंचायत सदस्य विजय निर्मळ,मोहन वाघ, म्हाळू बनसोडे, गणेश वाघ,शाकीर मुलांनी,राजू गायकवाड,अर्जुन वाघ,विठ्ठल बनसोडे,पोपट नागने,बालाजी विलास गायकवाड,यांच्या सह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शिबिर पार पाडण्यासाठी दर्लींग हांडे,योगेश मोरे,सागर गायकवाड,आदित्य हांडे,राजू निर्मल,दाजी व्यवहारे,रणजीत बनसोडे,अमर गायकवाड,समाधान नागने,तानाजी खिलारे,
आण्णा गायकवाड,गणेश गायकवाड,गोरख सरिख,नागेश ताड,सत्यवान बनसोडे,
अनिकेत गायकवाड, मनोज गायकवाड
अजय वाघमोडे,सुमित गायकवाड, अविनाश गायकवाड,दत्ता वाघमोडे यांनी परिश्रम घेतले.
Tags
सामाजिक वार्ता