पंढरपूरात भव्य "नोकरी महोत्सव" चे थाटात उद्घाटन...

सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींचा मोठ्या प्रमाणात सहभाग 
पंढरपूर प्रतिनिधी-- 
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील तरुण बेरोजगार युवकांना नोकरी मिळवुन देण्यासाठी आज पंढरपूर येथील तनपुरे महाराज मठ या ठिकाणी " भव्य नोकरी महोत्सव" चे आयोजन भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल दादा सावंत यांच्या संकल्पनेतून हा भव्य नोकरी महोत्सव या भव्य नोकरी महोत्सवाचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आला. 
     
या नोकरी महोत्सव मध्ये महाराष्ट्रातील ५० कंपन्या सहभागी झाले आहेत.तर ऑनलाईन अर्ज १००० आले आहेत तर या कंपन्यामधून सुशिक्षित तरुण बेरोजगारांना ४५००कर्मचारी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे प्रत्येकांस नोकरी मिळणार आहे.या नौकरी महोत्सवात मोठ्या प्रमाणावर तरूण तरूणींचा सहभाग होता.पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील तरुणांना विविध कंपन्यांच्या माध्यमातून नोकरी मिळावी म्हणून हा नोकरी महोत्सव आयोजित करून अनिल दादा सावंत यांनी तरुण बेरोजगारांची मानसिकता जाणून या बेरोजगार युवकांना नोकरी मिळावी म्हणून हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला आहे.
    
 या ठिकाणी विविध शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवाराला या ठिकाणी आलेल्या विविध कंपन्यांच्या कडून मुलाखत घेतली जाणार आहे.आणि कंपनीला जे कोणी उमेदवार योग्य असतील त्यांना नोकरीचे नेमणूकीचे पत्र दिले जाणार आहे.
यावेळी उपस्थित मान्यवर अनिल दादा सावंत, संदीप मांडवे,यावेळी नागेश भोसले, आदित्य फत्तेपुरकर,शाम गोगाव,एम पाटील,अमर सूर्यवंशी, संजय बंदपट्टे, आदी मान्यवर उपस्थित होते.

नौकरी महोत्सवात तब्बल 540 युवकांना नियुक्तीपत्र....
आज भैरवनाथ शुगर व्हा. चेअरमन अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून आयोजित भव्य नोकरी महोत्सवास पंढरपूर आणि मंगळवेढा परिसरातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांनी प्रचंड सहभाग नोंदवला यामध्ये 1439 युवकांनी नोकरीसाठी अर्ज केले त्यापैकी तब्बल 540 युवकांना नियुक्तीपत्र देण्यात आले. विविध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तसेच लोकल कंपन्यांमध्ये 540 लोकांची नियुक्ती झाल्यामुळे नियुक्ती पत्र मिळालेल्या युवकांनी सावंत यांनी आयोजित सामाजिक उपक्रमाचे  कौतुक केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form