वीणा भजनी मंडळाच्या गायन सेवेने श्रोते मंत्रमुग्ध

पंढरपूर प्रतिनिधी--
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये वीणा भजनी मंडळाने आपली अभंग गायन सेवा रुजू केली. मंडळाच्या गायन सेवेने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले.

वीणा भजनी मंडळ दर वर्षी नवरात्र मध्ये आपली भजन व कीर्तन सेवा रुजू करतात.
देवीची गाणे, विविध संतांचे अभंग, गौळण आदी गायनाने श्री विठ्ठल मंदिरातील सभामंडपातील श्रोते तल्लीन झाले होते.
वीणा भजनी मंडळाच्या अध्यक्षा अनुराधा घाडगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भजन गायना बद्दल मंदिर समितीच्या वतीने सर्व गायकांचा सन्मान करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form