पंढरपूर प्रतिनिधी--
!!जागो धनगर जागो, जागते रहो सावधान!!
पंढरीरायाच्या नगरीत धनगर आरक्षणाचे घुमशान....
ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील २ करोडची मतदार संख्या असलेला आदिवासी धनगर जमात समूह आंदोलनाच्या पवित्र्यात.
धनगर ST आरक्षणाची मागणी घेऊन संपूर्ण राज्याचे प्रतिनिधित्व करणारा "सकल धनगर समाज "च्या वतीने पंढरपूर मध्ये टिळक स्मारक मंदिर येथे शेकडो धनगर बांधव आमरण उपोषणाला बसत आहे.
धनगरांच्या मतदानाच्या जिवावर राज्याच्या मुखूमंत्री पदी विराजमान झालेले मा उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस गेली साडेसात वर्षे सत्तेत आहेत.
भाजपा शिवसेना युतीने लेखी आश्वासन देऊनही व सत्ता उपभोगूनही गरीब आदिवासी धनगरांच्या जमातीच्या तोंडाला पाने पुसलेली आहे.
जमातीमध्ये राज्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांबद्दल प्रचंड चिड आणि राग आहे.
सनदशीर मार्गाचा अवलंभ करूनही वर्षानुवर्षांची घटनादत्त मागणी मान्य न करणे म्हणजे फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यात, छत्रपती शिवरायांच्या, मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यामाईच्या राज्यात लोकशाहीचा व धनगरांच्या न्याय हक्क अधिकाराचा दिवसा ढवळ्या खून पाडला जातोय.
आत्ता हा सर्वं प्रकार धनगर बांधवांच्या सहनशीलतेचा कडेलोट करणारा आहे.
सरकार मुळ प्रश्नाला बगल देऊन धनगरांची घोर निराशा करत आहेत.
आत्ता आरक्षणाची अंमलबजावणी केल्याशिवाय माघार नाही हाच उद्देश घेऊन धनगर बांधव ९/९/२०२४ सोमवार पासून पंढरपूर येथे आमरण उपोषणाला बसत आहेत.
Tags
सामाजिक वार्ता