पंढरपूर प्रतिनिधी --
‘स्वेरी’ ही शिक्षणसंस्था शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबरोबरच सामाजिक कार्यात देखील सातत्याने सहभाग घेवून स्तुत्य कार्य करत असते. स्वेरीचे विद्यार्थी प्रत्येक सामाजिक व विधायक कार्य करत असतात. स्वेरीचे सामाजिक कार्य खरोखर कौतुकास्पद असते.’ असे प्रतिपादन पंढरपूर शहरातील नवरंगे बालकाश्रम व्यवस्थापनाच्या अधिक्षिका श्रीमती राजश्री गाडे यांनी केले.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने, स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरने सामाजिक सेवेचा वसा घेतला असून स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार आणि उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या सहकार्याने इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या ‘इलाईट फोरम’ मार्फत पंढरपूर मधील वा.बा. नवरंगे बालकाश्रमाला पाणी शुद्धीकरण यंत्र भेट देण्यात आले.
हे पाणी शुद्धीकरण यंत्र बालकाश्रमातील मुलांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल असे नवरंगे बालकाश्रमाच्या व्यवस्थापनाने स्वेरीच्या या भेटवस्तू बाबत कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमास बालकाश्रमाचे लेखाधिकारी धर्मराज डफळे, इलाईट फोरमचे समन्वयक प्रा. एस. आर. वाघचवरे, प्रा. एम.ए. सोनटक्के, प्रा. एस.एस. गावडे, प्रा. ए.ए. गरड, इलाईट फोरमचे अध्यक्ष तुषार बर्ले आणि गिरीजा देशमुख यांच्या सह इलाईट फोरमचे सदस्य उपस्थित होते.
Tags
शैक्षणिक वार्ता