पंढरपूर प्रतिनिधी -
माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन करण्यासाठी करोडो रुपयाचा निधी मंजूर करून संत पेठ परिसरातील हजारो नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटविला आहे. याचा सातत्याने पाठपुरावा माजी नगराध्यक्ष वामन तात्या बंदपट्टे व या भागातील युवा कार्यकर्ते भावी नगरसेवक अशोक शिंदे( पिंटू माळी)यांनी केल्याने आता गोरगरिबांच्या अंगणात गंगा अवतरली आहे. परिचारक यांच्या रूपातून प्रत्यक्ष पंढरीचा विठोबा पावला आहे अशा भावना भूमिपूजन प्रसंगी येथील जनतेने व्यक्त केल्या.
पंढरपूर शहरातील संत पेठ परिसरातील रमाई नगर ते आराम गादी कारखाना आणि बागवान मोहल्ला परीसर गरड गल्ली या संपूर्ण प्रभागात पिण्याच्या पाण्याची समस्या अनेक वर्षापासून होती,पिण्याचा पाण्यासाठी या भागातील लोकांना पुर्वी वणवण फिरावे लागत असायचे,. महीला, माता भगिनी यांचा हा त्रास आता संपुष्टात येणार आहे.
आपल्या भागात आता पाणी येणार या सुवार्तेने नागरिकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले,नागरिकांतून माजी नगराध्यक्ष वामन तात्या बंदपट्टे, भावी नगरसेवक अशोक शिंदे उर्फ पिंटू माळी यांचे कौतुक केले जात आहे. यावेळी आसिफ बागवान, अब्दुल रज्जाक आत्तार चडचणकर जमीर शेख उल्हास शिंदे, बाबा फकीर मुजीब बागवान, नासिर मुजावर सिकंदर बागवान महंमद अली बागवान आदी माहिला उपस्थित होते
Tags
सामाजिक वार्ता