उदगीर प्रतिनिधी--(बालाजी सुवर्णकार)
देगलूर रोड उदगीर येथील राधे कृष्ण मंगल कार्यालय उदगीर येथे जवळपास 2000 योग साधकांच्या उपस्थितीमध्ये योग साधनेचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
सदर कार्यक्रमात सुरुवातीला उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर,नगरपरिषद उदगीरचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर उदगीर, शहर पोलीस निरीक्षक करण सोनकवडे,
ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार, तसेच लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे ,उदगीर नगरीतील प्रसिद्ध उद्योगपती रमेश अंबरखाने ,पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार, तसेच लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे उदगीर नगरीतील प्रसिद्ध उद्योगपती रमेश अंबरखाने धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉक्टर दत्ता पाटील तसेच डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष माननीय डॉ.ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार तसेच लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे उदगीर नगरीतील प्रसिद्ध उद्योगपती रमेश अंबरखाने धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉक्टर दत्ता पाटील तसेच डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पाटील गटशिक्षणाधिकारी प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या मुख्य संचालिका महानंदा बहिणजी,भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष अमोल निळवदे देवणी बाजार समितीचे उपसभापती दिलीप मस्के उदगीर नगर परिषदेचे माजी नगर साईनाथ चिमेगावे तसेच उदगीर शहरातील समस्त सामाजिक संस्थांचे पदाधिकारीदेवणी बाजार समितीचे उपसभापती दिलीप जिमस्के उदगीर नगर परिषदेचे माजी नगरसेवक साईनाथ चिमे तसेच उदगीर शहरातील समस्त सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांचे पतंजली योग समिती शाखा उदगीरच्या वतीने स्वागत करण्यात आले.
सदर कार्यक्रमात पतंजली योग समितीच्या सुमन चव्हाण यांनी स्वागत गीत सादर केले त्यानंतर सुवर्णमाता देशमुख विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी योग नृत्य अतिशय उत्कृष्टपणे सादर केले त्यानंतर पतंजली योगसमितीचे अध्यक्ष सुरेंद्र आकनगीरे यांनी प्रास्ताविक सादर केले यानंतर उपस्थित मान्यवरापैकी प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या मुख्य संचालिका महानंदा बहिणजी यांनी अध्यात्मिक मार्गदर्शन केले यानंतर जिल्हा परिषद लातूरचे माजी अध्यक्ष राहुलजी केंद्रे यांनी उपस्थित सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रसिद्ध उद्योगपती रमेशजी अंबरखाने यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या
प्रशासनाच्या वतीने माननीय सुशांत शिंदे उपविभागीय अधिकारी उदगीर यांनी शुभेच्छा दिल्यायानंतर मुख्य कार्यक्रमाची सुरुवात योग समितीचे योगशिक्षक उमाकांतजी अंबेसंगे यांनी शंखनाद करून सुरुवात केली यानंतर या योग साधनेसाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून पतंजली योग समितीचे महाराष्ट्र राज्य प्रभारी शिक्षक संघटन धनराजजी बिरादार यांनी योग साधनेचे महत्त्व विशद करून मुख्य कार्यक्रमास सुरुवात केली. भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाकडून आलेल्या सूचनेनुसार समाविष्ट केलेल्या आसन व प्राणायाम
सर्व उपस्थितांकडून अतिशय उत्कृष्टपणे करून घेतली.
सदर कार्यक्रमात पतंजली योग समितीचे योग शिक्षक तथा भारत स्वाभिमांचे अध्यक्ष श्री कपिकीरे व महिला पतंजली योग समितीच्या जिल्हाध्यक्षा मीनाक्षीताई स्वामी यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. सदर योगसाधना जवळपास एक तास सर्व साधारकांनी मंत्रमुग्ध होऊन केली यानंतर सदर कार्यक्रमाची सांगता संगीतमय वातावरणात शांतीपाठाने करण्यात आली. सदर कार्यक्रमाची सूत्रसंचालन प्रा. श्रीराम चामले यांनी केले व आभार पतंजली योग समितीचे युवा अध्यक्ष प्रा. श्रीकांतजी स्वामी सर यांनी केले. सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीमध्ये जेष्ठ नागरिक संघाचे सचिव श्री मुरलीधर जाधव पतंजली योग समितीचे तालुका प्रभारी सुमतीताई भातांबरे ताई त्याचबरोबर स्मिता पोद्दार, चंद्रकलाताई बिरादार, हनुमंतराव औरादे पतंजली योग समिती किसान संघटन प्रमुख पतंजली योग समिती कोषाध्यक्ष शिवकुमार शिरगिरे ज्येष्ठ योग साधक चांबोळे डॉक्टर धनराज एकोंडे विष्णुदास सुवर्णकार व आंतरभारतीचे सचिव शिवलिंग मठपती, मोरखंडे सर व प्राध्यापक अनंत जाधव ,एलआयसी उदगीर शाखाप्रमुख देशमुख पतंजली योग समितीचे सहसंयोजक एडवोकेट संजय माननीयकर योगशिक्षक नारायण पाटील,आदेप्पाताई , मधवरेताई ,
शिवशंकर पाटील, मधुमती शिंदे ,तसेच तालुक्यातील संपूर्ण प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी .
सर्व उदगीर नगरीतील योगप्रेमी बंधू-भगिनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाच्या समारोपानंतर डीसीबी बँक शाखा उदगीरच्या वतीने सर्वसाधारकांना फलोपहार वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य केले.
Tags
शैक्षणिक वार्ता