पंढरपूरकर प्रेरणा घेतील:- माझी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांचे प्रतिपादन
पंढरपूर प्रतिनिधी--
बोधिसत्व पांडुरंगाच्या पंढरी नगरीचे सांस्कृतिक व अध्यात्मिक वैभव संपन्न करणाऱ्या तथा महाथेरो भदंत ज्ञानज्योती यांनी नामकरण केलेल्या आणि त्यांच्या भिक्खूसंघाने अनुमोदन दिलेल्या
पंढरपूर नगरपरिषद प्रस्तावित
'महाधम्मरक्षित बुद्धभूमी' येथे
येणाऱ्या धम्म श्रद्धाळूंना बसण्यासाठी आसन व्यवस्था दिवंगत "वैभव अशोक प्रक्षाळे" यांच्या स्मृती प्रित्यर्थ
त्यांच्या कुटुंबियांकडून
ज्येष्ठ नवमी रविवार दिनांक ३०/०६/२०२४ रोजी राजमाता जिजाऊ पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर सकाळी ०९:३०वाजता
भारतभूषण संघ, पंढरपूर आणि सर्व धम्म श्रद्धाळू यांच्या उपस्थितीत भारतभूषण संघाचे प्रमुख मा. भगवानराव भोसले यांच्याहस्ते पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मा. लक्ष्मण शिरसट आणि सम्यक क्रांती मंच चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. प्रशांत लोंढे आणि पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी संघटना (इंटक) चे उपाध्यक्ष संतोष सर्वगोड यांच्याकडे लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी भारत सरकारचे सामाजिक न्यायमंत्री मा. ना. रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते रोपण केलेल्या महाबोधी वृक्षाचा वारसा सांगणाऱ्या बोधिवृक्षास जलसिंचन तसेच आसमंतात डौलाने फडकत असलेल्या धम्मध्वजास भारतभूषण संघाद्वारे वंदन करण्यात आले.
तसेच विश्र्वदीप भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पंचांग प्रणाम करून सामूहिक बुद्धवंदना करण्यात आली. या प्रसंगी सम्यक क्रांती मंच चे संस्थापक सिद्धार्थ जाधव, महासचिव स्वप्नील गायकवाड, सोलापूर जिल्हा अध्यक्ष अक्षय सोनवणे, कार्यकारिणी सदस्य दीपक (महाराज) वाघमारे , निलेश सोनवणे, इत्यादी मान्यवरांनी सहभागी होऊन आयु. अशोक प्रक्षाळे आणि त्यांच्या कुटुंबियांकडून लोकार्पण केलेल्या धम्मदानास अनुमोदन दिले.
या दान लोकार्पण सोहळ्याचा धम्मविधी बौद्धाचार्य आर.वाय. सुरवसे यांनी पार पडला याप्रसंगी समाजातील सर्व स्तरातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.
Tags
सामाजिक वार्ता