सोनार हक्क परिषदेच्या युवा आघाडी सोलापूर जिल्हा संघटकपदी गिरिष शहाणे यांची अभिनंदनीय निवड...

सोलापूर प्रतिनिधी--
श्री सिध्दरामय्या यांच्या पावन भुमित व श्री स्वामी समर्थ यांच्या कृपाशिर्वादांने सोलापूर येथे आज सोनार समाज संपर्क अभियान कार्यक्रम दरम्यान सोनार हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष राजेश भाऊ पंडित व सोनार हक्क परिषद ( युवा आघाडी राज्य संघटक) यांनी सोलापूर येथील सकल सोनार समाज बांधव यांच्या भेटी दरम्यांन आज सोनार समाजाचे युवा नेते तथा युवा आघाडी राज्य समन्वयक मा.श्री. निलेशजी भैय्या धाराशिवकर यांच्या नेतृत्वांत सोनार हक्क परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्री. सुधाकरराव शहाणे यांच्या सराफी दुकानी युवाश्री.गिरीष सुधाकरराव शहाणे यांची सोलापूर जिल्हा युवा संघटकपदी निवड करण्यांत आली व निवडीचे नियुक्ती पत्र सोनार हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेशभाऊ पंडित तसेच सरचिटणीस श्री. काशीनाथ भाऊ पोतदार तसेच जेष्ठ मार्गदर्शक आदरणीय श्री. श्रीकांतजी जोजारे साहेब व आदरणीय श्री. भुमकर साहेब तसेच सोनार हक्क परिषदेचे कार्यकारिणी सदस्य आदरणीय श्री. सुनिलराव पंडित (काकाश्री) तसेच सोलापूर शहर संघटकपदी या वेळी ह.भ.प.हरिप्रसाद धर्माधिकारी यांचे ही नियुक्तीपत्र या वेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यांत आले.

या वेळी सराफ बाजार येथे मोठ्या प्रमाणांत सोनार समाज बांधव आवर्जून उपस्थित होते.या वेळी शहाणे परिवारा कडून सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यांत आला या वेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष मा श्री. चंद्रकांतजी दादा वेदपाठक यांनी प्रास्ताविक केले व सर्व शाखीय सोनार समाज सामाजिक जाणीवेने शाखा भेद दूर ठेवूनं एकत्रित आले पाहिजे व समाजातील संघटन हे मजबूत करण्यांच्या दृष्टीने सर्वांनी सोनार हक्क परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेशी जोडले जाणे गरजेचे आहे असे ही सांगितले व सर्वांचे आभार श्री. सुधाकरराव शहाणे यांनी मानले औपचारिक कार्यक्रम हा खुपचं सुंदर व प्रेरणांदायी झाला...
ग्रेट सोलापूरकर.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form