पंढरपूर/प्रतिनीधी
पंढरपूर तालुक्यातील फुळचींचोली येथील रहिवाशी, महाराष्ट्र राज्य ग्राहक समिती महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा कु. प्रियांका परांडे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेतली आहे. त्याचे कार्य पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने त्यांना शिवसेना युवती सेनेच्या सोलापूर आणि माढा या दोन्ही विभागाची जबाबदारी देण्यात आली असल्याचे अधिकृत पत्र मिळाले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशिर्वादाने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेशाने, शिवसेना नेते खा गजानन किर्तीकर यांचे शिफारशीने, खा. डॉ श्रीकांत शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली, युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांचे सूचनेनुसार शिवसेना अंगीकृत असलेल्या युवती सेनेच्या सोलापूर जिल्ह्याचा जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे पत्र सचिव किरण साळी आणि प. महारांष्ट्रचे निरीक्षक शर्वरी गावंडे यांच्या सहीने देण्यात आले. यावेळी प्रियांका परांडे हिचा सत्कार करण्यात आला.
प्रियांका परांडे कॉलेज शिक्षण घेत असल्यापासून सामाजिक कार्य करीत आहेत. युवती व महिलांचे संघटन मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीशी आहे. ही बाब लक्षात घेऊन वरिष्ठ पातळीवरून त्यांच्यावर ही जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांना शुभेच्या देण्यात आल्या.
*संघटन वाढीचा अनुभव आहेच : प्रियांका परांडे*
मला मागील अनेक वर्षापासून संघटन बांधणी करण्याचा अनुभव आहे. आपण समाजसेवेच्या माध्यमातून आजवर अनेक लोकांची कामे केली आहेत. महिलांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. युवती व महिलांसाठी विविध कार्यक्रम घेतले आहेत. त्यामुळे आपल्याकडे सोलापूर जिल्ह्यातील महिलाचे मोठे जाळे आहे. याचा उपयोग आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्ष वाढीसाठी करणार असल्याचे परांडे यांनी सांगितले आहे.
Tags
सामाजिक वार्ता