पंढरपूर/प्रतिनीधी
मोहोळ विधासभा राखीव मतदार संघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजाभाऊ खरे यांनी आपली जोरदार फिल्डींग लावली आहे. अशातच त्यांच्या पत्नी तृप्तीताई खरे यांनी मकरसंक्रांती निमित्त मतदार संघातील गावोगावी हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्याकडून प्रत्येक महिलेला भेट वस्तूही दिली जात आहे. फुलचिंचोली येथील कार्यक्रमास शेकडो महिलांनी उपस्थिती दाखवत खरे परिवाराचे पाठीशी असल्याचे दाखवून दिले आहे.
मु.पो.फुलचिंचोलि येथील औंधकर वस्ती परिसर याठिकाणी ३१जानेवारी. रोजी. कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी महिलांनी मोठी उपस्थिती दाखवीत मोठा प्रतिसाद दिला आहे.
या कार्यक्रमाचे वेळी समाजसेवक विजूभाऊ खरे, प्रगतशील बागायतदार माजी सरपंच सौदागर गायकवाड, राजाभाऊ खरे यांचे कट्टर समर्थक-मा.बालाजी वाघ,शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष छगन पवार,तानाजी साळूंके,बाळासाहेब भोसले,माजी सरपंच मोहन दांडगे,पांडू(तात्या) डोंगरे,शिवाजी साळूंके,आण्णा भोसले,भैय्या वाघ,नेताजी भोसले,राजू भोसले,नितीन भोसले,अमित घोडके,अभिजित भोसले.. आदीसह फुलचिंचोली येथील ग्रामस्थ व महिला बहुसंख्येने.उपस्थित होते..
Tags
सामाजिक वार्ता