डॉ दत्तात्रेय काळेल यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार.


पंढरपूर प्रतिनिधी ---
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथील राज्यशास्त्र विभागातील प्रा. डॉ दत्तात्रेय काळेल सर यांना  त्यांच्या शैक्षणिक कार्याबददल  त्यांना सांगोला तालुकाचे  आमदार शहाजी बापू पाटील आणि दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद  पाटील व सोलापूर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष जयमालाताई  गायकवाड व पंढरपूर चे युवा नेते प्रणवदादा परिचारक यांच्या हस्ते डॉ दत्तात्रेय काळेल सर यांना श्री स्वामी समर्थ राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यामध्ये विविध क्षेत्रातील चांगले कार्य करणाऱ्या 22 मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले.हा पुरस्कार वितरण सोहळा सांगोला तालुकाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.व यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून युवा नेते प्रणव परिचारक उपस्थित होते.यावेळी मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form