पंढरपूर प्रतिनिधी ---
ग्राहक समिती महाराष्ट्राची बैठक प्रदेश अध्यक्ष तानाजीराव गुंड यांचे अध्यक्षतेखाली शासकीय विश्राम गृह पंढरपूर येथे खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली.सदर बैठकीत काही पदाधीकारी यांच्या निवडी करून त्यांना नियुक्तपत्र देण्यात आले. यावेळी स्वप्नील शेगर, रा. गुरसाळे यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आले. तसेच अनिता पंडित, रा. चळे यांची महिला जिल्हा कार्याध्यक्षपदी,राजेंद्र पंडित, रा.चळे यांची जिल्हा उपाध्यक्ष, नितीन नकाते रा. मगरवाडी यांची जिल्हा सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली.तर बैठकीत ग्राहकांच्या तक्रारी व समस्या जाणून घेऊन त्याचे निरसन करण्यात आल्या.
या बैठकीस प्रदेश सरचिटणीस अन्सर शेख, महादेव जाधव मागासवर्गीय जिल्हा अध्यक्ष आणि अमित पाटील, सोमनाथ जाधव, अमित कोळेकर, अतिश जाधव,दादा सुरवसे,विजय बोबाळे इत्यादी पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता