नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र फुगारे यांचा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कारने सन्मानित....

पंढरपूर प्रतिनिधी---
कोंढारकी  तालुका पंढरपूर येथील सुपुत्र राजेंद्र फुगारे यांना नुकताच श्री स्वामी समर्थ जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. राज्यातून अनेक प्रस्ताव प्राप्त झाले होते त्यामधून समितीने 22 जणांची जीवनगौरव पुरस्कारासाठी शिफारस केली होती.
 त्यामध्ये राजेंद्र फुगारे यांचे सामाजिक कार्य पाहता व त्यांना या अगोदरही अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्याबद्दल त्यांना सांगोला तालुक्याचे आमदार मा. शहाजी बापू पाटील, दामाजी कारखान्याचे चेअरमन मा. शिवानंद पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. जयमालाताई गायकवाड व पंढरपूरचे युवा नेते प्रणव परिचारक यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.


यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी मा. जितेंद्र खंडागळे, प्रा. नाथाजी चौगुले, नगरसेवक गुरुदास अभ्यंकर तसेच स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सुवर्णाताई खंडागळे, सचिव मा. संकेत खंडागळे इत्यादी उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्यामुळे राजेंद्र फुगारे यांचे सर्व स्तरांमधून अभिनंदन होत आहे. राजेंद्र फुगारे हे युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते सध्या सेंट्रींग कॉन्ट्रॅक्टर बरोबर संवाददृष्टी न्यूज चे संपादक आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form