पंढरपूर प्रतिनिधी --
शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे कलेमध्ये वाव मिळावा या हेतूने राबवण्यात येणार्या यश पब्लिक स्कुलच्या विविध उपक्रमांना यश येत असल्याचे त्यांच्या स्नेहसंमेलनातून जाणवत आहे. परीक्षांमधून गुणवत्ता देणे तर सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलेला वाव देणे यांची मोठी सांगड या उपक्रमांमधून दिसून येते. आपला विद्यार्थी हा फक्त शिक्षणातच नव्हे तर क्रिडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही अव्वल असावा हाच त्यामागील मानस आहे. असे प्रतिपादन ॲड.उदय बागल यांनी केले.
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील यश पब्लिक स्कुलच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. पुढे बोलताना बागल यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे महत्व सांगुन विविध उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी कार्यक्रमासाठी ऍड.शिवराज पाटील , सोमनाथ जगताप, अध्यक्षा प्रगती पाटील, शाळा समन्वयक विजय तुरेवाले, मुख्याध्यापक सचिन लोखंडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी स्नेहसंमेलनामध्ये चिमुकल्यांनी नृत्य, नाटीका, गायण, देशभक्तीपर गीत आदींव्दारे प्रेक्षकांची वाहवा मिळवली. हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल संस्थेचे मार्गदर्शक पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांनी शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले.
तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक सत्यवान लोखंडे, शंकर जाधव , ऐश्वर्या कुलकर्णी, अश्विनी पवार, भारती वराडे, सोनाली चव्हाण, अश्विनी जानकर , सोनाली नाईकनवरे, चंदा कुंभार, शिक्षकेतर कर्मचारी कल्याण म्हसवडे, उस्मान गोरे,पद्मिनी सुतार , अर्जुन पाटोळे यांनी परिश्रम घेतले.
Tags
शैक्षणिक वार्ता