केले गुरूचें वैद्यकीय उपचार डॉ.सरडे कुटूंबीयांच्या व माजी विद्यार्थ्यांचे योगदान....
रोपळ प्रतिनिधी ---
आपल्या गुरूला गुरूदक्षीणा दिल्याची अनेक उदाहरणे इतिहासामध्ये अथवा पोती पुराणामध्ये अनेक वेळा आपण अनुभवतो. परंतु आजच्या अधुनिक आणि धकाधकीच्या जीवनामध्ये गुरूसाठी ऋणानुबंध दाखवीत गुरूदक्षीणा देण्याची प्रिचती दिली ती म्हणजे रोपळे येथील तत्कालीन न्यु इंग्लिश स्कुलच्या माजी विद्यार्थ्यांनी. आपल्या गुरूसाठी पै पै जमवून त्यांचे लाखो रूपये खर्चाचे ऑपरेशन पुर्ण केल्यामुळे या मिळालेल्या अनोख्या गुरूदक्षीणेमुळे त्या गुरूसही आनंदाआश्रु आवरता आले नाहीत. गुरू शिष्यातील हे नातंच आजच्या सोशेलायझेनच्या जमान्यात खर्या अर्थाने आदर्शवत ठरते आहे.
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील न्यु इंग्लिश स्कुल या शाळेमध्ये शाळेच्या निर्मीतीपासून तिला भव्यदिव्य स्वरूप देण्यासाठी सबंध नोकरीभर धडपडणारा मौल्यवाण माणिक म्हणजे शिक्षक माणिक चौधरी. सुख दुःखाचे अनेक प्रसंग पचवत शाळेची निर्मीती आणि गुणवत्ता यासाठी त्यांनी आहोरात्र झगडा दिला. त्यांच्या झगड्याला यश येवून आज शिवाजीभाऊ बाबा पाटील हे रयतचे विद्यालय साकारले आहे. यामध्ये अनेकांचे सहकार्य लाभले आहेच.
या शाळेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना घडवणार्या चौधरी सरांचे रोपळे जणू माहेरघरचं. माजी विद्यार्थी आणि चौधरी यांची अपुलकी शब्दापलीकडची. हीच आपुलकी त्यांच्या सेवा निवृत्तीच्या काळातही मोठे बळ देते आहे. शिक्षक चौधरी यांच्या दोन्ही गुडघ्याची मोठी झीज झाल्यामुळे त्यांचे करणे अत्यंत गरजेचे होते. परंतु होणारा खर्च लाखात होता. परंतु याची जाणीव माजी विद्यार्थ्यांना होताच ते मदतीसाठी सरसावले आणि ऑपरेशन यशस्वी सुध्दा झाले. यासाठी माजी विद्यार्थी व ज्ञानकांचन हॉस्पिटलचे डॉ .संजय सरडे, डॉ .स्नेहल सरडे, डॉ .विजय सरडे व सरडे कुटूंबाने मोठे योगदान दिले.
आज गुरूवारी शिक्षक चौधरी यांना हॉस्पिटल मधून डिसर्चाज मिळणार असल्याने 1994-95 च्या इयत्ता दहावीच्या बेचने ऋण व्यक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षक कोळी , गौरी खिस्ते, संजिवनी वेदपाठक, रेश्मा माळी , श्रीकृष्ण दाढे, सलीम पठाण, दादासाहेब रोकडे, दादासाहेब लोखंडे, महेश लटके, गणेश अढवळकर, दत्ताभाऊ भोसले, अशोक गायकवाड, डॉ .हनुमंत खपाले, डॉ .महावीर शहा, नारायण गायकवाड आदी उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी माजी विद्यार्थी भारावून गेले तर शिक्षक माणिक चौधरी यांना मिळालेल्या गुरूदक्षीणेमुळे त्यांनाही आनंदाआश्रु आवरता आले नाहीत. गुरूसेवेचे महदभाग्य मिळाल्याच्या भावूक भावना यावेळी माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. गुरू शिष्याच्या या अनोख्या ऋणानुबंधाची हि कहाणी समाजातील अनेकांसाठी प्रेरीत करणारी असल्याचे स्पष्ट होत आहे.
Tags
शैक्षणिक वार्ता