रांझणी आरोग्य उपकेंद्राचा आज पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा...

 पंढरपूर प्रतिनिधी ---
पंढरपूर तालुक्यातील रांझणी येथे आरोग्य उपकेंद्र उभा करण्यात आले आहे. याचा लोकार्पण सोहळा उद्या शुक्रवारी सकाळी नऊ वाजता पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या उपकेंद्राचा फायदा वीस हजार ग्रामस्थांना होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंत नाना देशमुख यांनी दिली.

रांजणी व परिसरातील ग्रामस्थांना वैद्यकीय उपचार वेळेत व २४ तास मिळावेत म्हणून रांझणी येथे आरोग्य उपकेंद्र उभा करण्यात आले आहे. यासाठी सुमारे आठ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.येथे डॉक्टरांची
निवासाची सोय करण्यात आली आहे. यामुळे रुग्णांना २४ तास सेवा मिळणार आहे. आरोग्य उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी सकाळी ९ वाजता रांझणी येथे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील तसेच डॉ.तानाजीराव सावंत सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्या हस्ते होणार आहे. 

यावेळी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार समाधान आवताडे, आमदार यशवंत माने, माजी आमदार प्रशांत परिचारक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form